शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 21:34 IST

दोन लाखावर चाचण्या : ४५ हजार ३१० रुग्ण बरे    

जळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान कालावधीत जिल्ह्यात त्वरीत शोध, त्वरीत निदान आणि त्वरीत उपचार (ट्रेस, टेस्टींग, ट्रीटमेंट) या त्रिसुत्रीचा अवलंब केला जात आहे. या त्रिसुत्रीमुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. शोधलेल्या व्यक्तींची त्वरीत तपासणी करण्यात येत आहे. त्यांच्या आजाराचे निदान करुन बाधित आढळलेल्या रुग्णांवर त्वरीत उपचार केले जात आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहे. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानकारक बाब असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.                   जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ३१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.२२ टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या ३ हजार ७०१ ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी १ हजार ६७९ रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २ हजार ६८६ रुग्ण हे लक्षणे नसलेले असून अवघे १ हजार १५ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत. जिल्ह्यात सध्या कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ७ रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५३८, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ४७७ रुग्ण उपचार घेत आहेत. तर विलगीकरण कक्षात ३२८ रुग्ण आहेत. जिल्ह्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत असल्याने गेल्या वीस दिवसांपासून सलगपणे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ४१० ने कमी झाली आहे. ही जिल्ह्यासाठी समाधानाची बाब आहे.            जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजनयुक्त बेड तयार झाले आहेत. सद्यपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात १२ हजार ८५४ बेड असून त्यापैकी २ हजार १९ ऑक्सिजनयुक्त बेड असून ३२२ आयसीयु बेडचा समावेश आहे.           माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानात आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. या तपासणीत लक्षणे जाणवताच नागरिकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे ९६ हजार ७२४ तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे १ लाख २० हजार ५०८ अशा एकूण २ लाख १७ हजार २३२ संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी १ लाख ६५ हजार ३५३ चाचण्या निगेटिव्ह तर ५० हजार २२२ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. इतर अहवालांची संख्या १ हजार १२३ असून ५३४ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात एका दिवसात २ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत १ हजार २११ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा २.४१ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव