शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

बाधित असूनही डॉक्टरकडून रुग्ण तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 17:04 IST

स्वत: कोरोना बाधित असतानाही रुग्णांची तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरने २२ जणांना बाधित केल्याची माहिती समोर येत आहे.

ठळक मुद्दे बोदवड येथील डॉक्टरचा प्रतापडॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

बोदवड, जि.जळगाव : स्वत: कोरोना बाधित असतानाही रुग्णांची तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरने २२ जणांना बाधित केल्याची माहिती समोर येत आहे.या खासगी डॉक्टरविरुद्ध बोदवड पोलिसात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बोदवड शहरातील नाडगाव रस्त्यावर राहणारा ४१ वर्षीय खासगी डॉक्टर २५ जूनला करंजी येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता. यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले.ग्रामीण भागात जावून ते वैद्यकीय सेवा देतात. या दरम्यान त्यांना अहवाल येईपर्यंत होम क्वॉरंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यांनी नियमांचे उल्लंघन करीत बोदवड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील नाडगाव येथे तसेच १० किलोमीटर अंतरावरील शेलवड येथे जावून काही रुग्णांची तपासणी केल्याची माहिती मिळत आहे. २७ व २८ रोजी त्यांनी ही तपासणी केली. या दरम्यान या डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरांनी तपासलेल्या रुग्णांनाही बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.होम क्वॉरंटाईन होण्याच्या नियमांचे उल्लंघन करून रुग्णांची तपासणी केली. यातून रुग्णांनाही कोरोनाची बाधा झाली. यामुळे तहसीलदार हेमंत पाटील यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज चौधरी यांना या डॉक्टरविरुद्ध फिर्याद देण्याचे आदेश दिले. त्यावरून आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा, महाराष्टÑ कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, या डॉक्टरच्या कुटुंबातील सहा जणांना जळगावी कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच शेलवड येथील १६ रुग्णांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत. यांनाही जळगावी कोविड रुग्णालयात दाखल केले आहे. याशिवाय २० जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBodwadबोदवड