शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

पासवर्ड सुंदर अक्षराचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 16:16 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात साहित्यिक किशोर ज्ञानेश्वर कुलकर्णी लिखित ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ या पुस्तकाचा रवींद्र मोराणकर यांनी थोडक्यात करून दिलेला परिचय.

संगणक, मोबाइलवर पासवर्डशिवाय आपल्याला काही करता येत नाही. तसंच ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ हे छोटेखानी पुस्तक जळगाव स्थित लेखक किशोर ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. सुंदर अक्षराचा गुरुमंत्र त्यांनी दिला आहे. पुस्तक हाती पडल्यानंतर आपल्याला क्षणभर वाटेल, की हे तर आपण बालवाडीतच शिकलोय. मात्र आपण जसे पुढे जातो, तसंतसं सगळं सपाट होतं. गतकाळाचं आपल्याला विस्मरण होतं. सुंदर अक्षरासाठी काय करणं महत्त्वाचं आहे, हे या पुस्तकात लेखकानं सांगितलं आहे. वर्तुळ हे वर्तुळच काढा. दुसरं म्हणजे अर्धवर्तुळ हे चार प्रकारचे. खालच्या बाजूला तोंड असलेले, वरच्या बाजूला तोंड असलेले, डाव्या बाजूला तोंड असलले, उजव्या बाजूला तोंड असलेले अर्धवर्तुळ. याच जोडीला अक्षरासाठी रेषादेखील तितकीच महत्त्वाची ठरते. आडवी रेषा, डावीकडे वरुन खाली येणारी तिरपी रेषा, उजवीकडे खाली जाणारी आणि उभी रेषा अशा नऊ रेषा प्राथमिक चिन्हांचा वापर सराव करणे आवश्यक ठरते. देवानागरीच नव्हे तर अस्तित्वात असलेल्या लिपी या नऊ चिन्हांनी बनलेल्या आहेत.सुंदर अक्षरासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षराची मुख्य रेषा सरळ, अक्षराची मुख्य रेषा जेवढी आहे तेवढे अंतर दोन अक्षरांममध्ये ठेवावे. हे अंतर कुठल्याही परिस्थितीत कमी-जास्त होता कामा नये.सुंदर अक्षरामुळे आपली वेगळी छाप पडते. सातत्याने सराव केल्यास अक्षरात चांगला बदल घडतो, असा लेखकाचा दावा आहे. अक्षराचा मुख्य रेषा सरळ असावी. आपले शरीर ज्याप्रमाणे प्रमाणबद्ध असते, त्याप्रमाणे अक्षरांचेही असते. अक्षरांचेही शरीर असते.विद्यार्थ्यांचे अक्षर सुंदर व्हावे या उद्देशाने लेखक १९९७ पासून सुंदर अक्षराची कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करीत आहेत.लेखकाच्या मते सुंदर अक्षरासाठी वर्णाची मुख्य रेषा काढावी. अक्षराच्या मुख्य रेषेच्या निम्मे इतर अवयव, दोन ओळींंमध्ये, दोन शब्दांमध्ये मुख्य रेषेएवढे अंतर असावे. उदाहरण द्यायचं झालं तर अ हा वर्ण काढावयाचा असेल तर त्याची उभी मुख्य रेषा सरळ काढावी, दुसरा नियम म्हणजे इतर मुख्य रेषेच्या निम्मे काढावे. अ चे इतर अवयव विचारात घेतले तर दोन अर्धगोल आणि त्या अर्धगोलांना जोडणारी आडवी रेषा ही मुख्य रेषेच्या अर्ध्या इतकी आहे, हे अर्धगोल आणि आडव्या रेषेचा विचार केला तर हा नियम बरोबर लागू होतो. यासह इतर बाबी लेखकाने सांगितल्या आहेत.लेखक : किशोर ज्ञानेश्वर कुलकर्णी, प्रकाशक : कृपा प्रकाशन, मूल्य २५ रुपये.

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव