शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

परवीनच्या प्रवेशाची कागदपत्रे मिळेना

By admin | Updated: October 21, 2014 13:19 IST

इराणची विद्यार्थिनी परवीन बिरगोनी हिच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आणि शिक्षक भवनातील प्रवेशाबाबतच्या अधिकृत कागदपत्रांची पूर्तता अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून पोलिसांना करण्यात आलेली नाही.

 

जळगाव : इराणची विद्यार्थिनी परवीन बिरगोनी हिच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आणि शिक्षक भवनातील प्रवेशाबाबतच्या अधिकृत कागदपत्रांची पूर्तता अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकार्‍यांना करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे तपासात अडथळे येत आहेत. 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थिनीवर अला अब्देल या परदेशी विद्यार्थ्याने परवीन बिरगोनी या परदेशी विद्यार्थिनीच्या मदतीने अत्याचार केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर अला अब्देल हा विद्यार्थी अनधिकृतपणे विद्यापीठाच्या शिक्षक भवनात राहिला असल्याचे उघड झाले. त्यानंतर प्रशासनाच्या दबावामुळे शिक्षक भवनातील कर्मचारी सीताराम पवार यांनी आत्महत्या केली. त्यामुळे प्रकरण अधिकच चिघळले. मात्र या प्रकरणात त्या विद्यार्थिनीच्या प्रवेशाचे घोंगडे डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाचे प्रा.रमेश पोतदार यांच्यावर झटकले. विद्यापीठाच्या सांगण्यावरून परवीनला संमती पत्र दिल्याचे प्रा.पोतदार यांनी म्हटले आहे. या विद्यार्थिनीच्या प्रवेशाबाबतची फाईल गेल्या दीड वर्षांपासून गायब होती. त्यातच परवीनच्या प्रवेशाबाबतची सर्व कागदपत्रे असल्याचा दावा विद्यापीठाने केला होता.
-----------
विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणाचा तपास करणार्‍या तपास अधिकारी कोडापे यांनी परवीन बिरगोनी हिच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,शिक्षक भवन आणि मुलींच्या वसतीगृहातील प्रवेशाबाबतच्या कागदपत्रांची चार दिवसांपूर्वी लेखी पत्राव्दारे विद्यापीठ प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने अद्याप परवीनच्या प्रवेशाबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता तपास अधिकार्‍यांकडे केलेली नाही. वसतीगृहाच्या अधीक्षिका शारदा चव्हाण यांनी परवीनच्या वसतीगृहातील प्रवेशाबाबत कोणतीही कागदपत्रे नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले होते. परवीनच्या विद्यापीठ प्रवेशाबाबतचाही गोंधळच आहे. मात्र त्याची जबाबदारी परस्परांवर ढकलून या प्रकरणातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न होत आहे.