शहरं
Join us  
Trending Stories
1
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
2
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
3
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
4
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
5
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
6
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
7
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
8
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
9
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
10
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
11
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
12
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
13
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
14
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
15
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
16
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
17
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
18
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
19
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
20
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."

धावत्या रेल्वेत चढताना परप्रांतीय महिला जखमी

By admin | Updated: May 20, 2014 01:17 IST

उपचार सुरू: रेल्वे मालधक्क्याजवळ सकाळची घटना

 जळगाव : बोईसर येथून बनारस जवळील आपल्या गावी निघालेल्या चौबे कुटुंबावर सोमवारी सकाळी आघात कोसळला. पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरल्यानंतर अचानक सुरूझालेली रेल्वे गाडी पकडण्याच्या प्रयत्नात चौबे कुटुंबाची सर्कस सुरू झाली. यात पती,तीन मुले व सासरा यांनी गाडी पकडली. मात्र प्रियंका चंदन चौबे ही महिला गंभीर जखमी झाली. मुंबई येथील भिवंडी परिसरातील खाजगी कंपनीत कामाला जाणारे चंदन चौबे हे पत्नी प्रियंका चौबे, मुलगा दीपक, छोटू व जिया यांच्यासोबत रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास एका एक्सप्रेसमध्ये बोईसर येथून बसले. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास ही एक्सप्रेस निमखेडी परिसरातील एक नंबर मालधक्क्याजवळ थांबली. रात्रभर बसून कंटाळा आलेल्या चौबे दाम्पत्य मुलांसह पाय मोकळे करण्यासाठी खाली उतरले. या दरम्यान अचानक रेल्वे सुरू झाल्याने पाचही जणांची धावपळ सुरू झाली. रेल्वे सुरू झाल्यानंतर तिला पकडण्याचा प्रयत्नात चंदन चौबे, मुलगी जिया, मुलगा दीपक, छोटू आणि सासरा हे यशस्वी झाले. या दरम्यान प्रियंका यांनी रेल्वेच्या मागे धावण्यास सुरुवात केली. मात्र त्या पायरीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला, डाव्या पायाला, तोंडाला, दोन्ही हाताला मार बसला. जखमी अवस्थेत ही महिला गणेश कॉलनीलगतच्या रेल्वेरुळापर्यंत पायी चालत आली. मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्याने काही वेळेनंतर तिला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडली. नागरिकांनी जखमी प्रियंका चौबे यांच्याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला माहिती दिली. त्यानुसार साहाय्यक फौजदार मनोज शहा व सहकार्‍यांनी तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉ.अजय सोनवणे यांनी तिच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. काही वेळेनंतर ही महिला शुद्धीवर आली. या दरम्यान रुग्णालयातील काही जणांनी या महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेकडील मोबाईलवर काही वेळेनंतर पतीचा फोन आला. अपघाताबाबत महिलेच्या वडिलांना माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार वडील जळगावकडे निघाले आहेत. तर पती चंदन चौबे हे मुलांना बनारस जवळील चैनपूर, खरीगमा या गावी सोडून जळगावकडे निघणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संध्याकाळी या महिलेच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा झाली. मात्र डोक्याला आणि चेहर्‍याला जबर मार बसल्यामुळे खूप वेदना होत असल्याचे तिने सांगितले. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती. नातेवाईक मंगळवारी दुपारपर्यंत जळगावात दाखल होण्याची शक्यता आहे.