शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बोरखेडे शिवारात बिबट्याने फस्त केले पारडू आणि वासरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 20:07 IST

सलग दोन दिवस टिपले सावज, परिसरात भीतीचा थरार

चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव शहराच्या पूर्वेला अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बोरखेडे बुद्रूक शिवारात बिबट्याने शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवस म्हैस व गायीच्या पारडू आणि वासरूवर हल्ला करुन त्यांना ठार केले. वनविभागाने शोध मोहीम केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे मिळून आले आहेत. लवकरच या परिसरात पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती चाळीसगाव वनविभागाचे वनसंरक्षक संजय मोरे यांनी दिली.बोरखेडे शिवारात शनिवारी पहाटे बिबाट्याच्या हल्ल्यात म्हशीचे ठार झालेले पारडू आढळून आले. हिस्त्र प्राण्याचा हल्ला असल्याचे लक्षात आल्यानंतर वनविभागाला कळविले गेले. रविवारी पहाटे सुभाष चिंधू पाटील यांच्या शेतातील गायीच्या वासरावर बिबट्याने झडप घालून त्याला ठार केले.वनविभागाच्या कर्मचाºयांनी परिसरात शोधमोहीम केली असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. याभागात तत्काळ पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव पाठविला असल्याचेही मोरे यांनी सांगितले. दरम्यान वनविभागाने रविवारी परिसरात बिबट्यापासून घ्यावयाची काळजी याची पत्रके वाटली. नागरिकांनी सर्तक राहण्याचे आवाहनही केले.‘बिबट्या’चे कमबॅक आणि भीतीनोव्हेंबर महिन्यात वरखेडे शिवारात बिबट्याने तळ ठोकून पाच मानवी जीव घेत अनेक पाळीव प्राण्यांनाही ठार केले होते. खासगी शुटर्सव्दारा बिबट्याचा खात्मा झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. पुन्हा नऊ महिन्यांनी बोरखेडे शिवारात बिबट्याने शिकार करुन आपण आल्याची एकप्रकारे वर्दी दिली असून परिसरातील नागरिक, शेतकरी कमालीचे भयभीत झाले आहेत. सद्यस्थितीत पावसाची संततधार सुरू असल्याने शेतात लगबग आहे. बिबट्याचा परिसरात वावर असल्याचे लक्षात आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.