शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळकोठा गोळीबार प्रकरणातील एका आरोपीस पारोळा पोलिसांनी धुळ्यात पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 16:17 IST

पिंपळकोठा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम यास पारोळा पोलिसांनी पकडले.

ठळक मुद्देयाआधी एकास नाशिक येथून घेतले आहे ताब्यात अद्यापही तीन जण फरार

पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील पिंपळकोठा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम (वय १९, रा.नवलनगर, ता.जि.धुळे) या संशयित आरोपीस पारोळा पोलिसांनी धुळे येथे सोमवारी पकडले. याआधी जगदीश अभय उदेवाल (रा.अमळनेर) यास पोलिसांनी पकडले आहे. मात्र अद्यापही तीन संशयित आरोपी फरार आहेत.पिंपळकोठा येथे यात्रेदरम्यान पूर्व वैमनस्यातून आरोपी जगदीश पाटील, तुषार प्रदीप कदम व इतर साथीदारांनी भांडण सोडवण्यास गेलेले चनेश्वर नथ्थू पाटील (वय ३०) यांच्या पोटात गावठी कट्ट््याने गोळी मारत फरार झाले होते. पारोळा पोलिसात भाग पाच, गु.र.नं. २१७/ १९, भा.दं.वि.कलम ३०७ आर्म अ‍ॅक्ट, ३/७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. भांडण सोडविण्यास गेला याचे वाईट वाटून ही घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली होती.घटना घडल्यानंतर यातील संशयित जगदीश अभय उदेवाल (वय १९, रा.अमळनेर) यास पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी रात्री दहाला नाशिक येथून अटक केली आहे. यानंतर बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम हा धुळे येथे फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला व बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम यास पारोळा पोलिसांनी पकडले.जगदीश उदेवाल व बाळा कदम यास पोलिसांनी पकडल्यानंतर आता अजूनही तीन संशयित फरार आहेत. त्यात जगदीश पुंडलिक पाटील (रा.पिंपळकोठा, ता.पारोळा), सागर संजय पाटील व गौरव विजय पाटील (दोन्ही रा.अमळनेर) यांचा समावेश आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस ठाण्याचे पो.काँ.सुनील साळुखे, पो.कॉ.पंकज राठोड, किशोर भोई, दीपक अहिरे या पथकाने बाळा उर्फ तुषार कदम यास पकडून पारोळा पोलीस ठाण्यात आणले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीParolaपारोळा