संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनातून सभा आयोजित करण्यात येऊन या सभेत शिक्षक - पालक संघाची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी प्रवीण महाजन, उपाध्यक्ष यशवंत माळी, सचिव शीतल चावरे, सहसचिव नीलिमा रोटे व इतर सभासदांची निवड करण्यात आली. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये होणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाबद्दलचे महत्त्व तुषार रंधे व वंदना चौधरी यांनी सांगितले. तर मुख्याध्यापक प्रवीण महाजन यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या. पालकांना येणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाबद्दलच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. सभेचे नियोजन स्वाती अत्तरदे व पूजा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा पाठक यांनी केले, तर वैशाली भोळे यांनी आभार मानले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
नशिराबाद विद्यामंदिरात पालक शिक्षक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST