शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

परमार्थ हाच खरा धर्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 12:06 IST

भगवंतांनी धर्मासाठी स्वत:च्या इच्छेने क्षेत्र निर्माण केले. हे ब्राह्मंड निर्माण करताना भगवंतांनी मर्यादा राखून हे विश्व निर्माण केले. विश्व ...

भगवंतांनी धर्मासाठी स्वत:च्या इच्छेने क्षेत्र निर्माण केले. हे ब्राह्मंड निर्माण करताना भगवंतांनी मर्यादा राखून हे विश्व निर्माण केले. विश्व निर्माण करताना अधर्म कुठेही वाढणार नाही याची काळजी घेतली. जेव्हा वाटलं की अधर्म वाढतो आहे तेव्हा भगवंतांनी तो नष्ट करण्यासाठी पांडवासारख्या धर्मप्रिय व्यक्तींना धर्म वाढवण्यासाठी उत्तेजित केले. त्यांचे हातून धर्मकार्य करून घेतले. कुळधर्म वंश परंपरेने चालत येतात. कुळधर्म नाहीसे झाले तर कुळाचा नाश होतो.धर्माचा नाश झाला तर कुळात पाप वाढीस लागते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत उपदेश करताना सांगतात की, पाप अधिक वाढले, संसारातील जडण-घडण बिघडले तर त्यामुळे वर्णव्यवस्था नाश पावते. वर्णसंकट कुळाचा नाश करणारांना नरकात नेते. कारण श्राद्ध, तर्पण जर केले नाही तर त्याला मुकलेले पूर्वज, पितर हे अधोगतीला जातात. त्यामुळे वर्णसंकट करणाऱ्या दोषामुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उद्ध्वस्त होतात.मनुष्य प्राणी बुद्धिमान असूनही सुखासाठी एकमेकांना मारण्यास तयार होतो. ही खेदाची गोष्ट आहे. परंतु धैर्यवान पुरुषाला मोह निर्माण होत नाही. सुख -दु:ख समान मानणाºया धीर पुरुषाला कोणताही मोह न झाल्यामुळेच भगवंताचे तत्त्व जाणून तो सत्प्रवृत्त होतो. जे निर्माण झाले आहे ते नाश पावणार आहे हे ज्याला समजलं तो आपले जीवन सत्कारणी लावण्यासाठी अविनाशी शक्तीला शरण जातो. जन्माला येण्यास जसा काळवेळ नाही तसेच मृत्यूला देखील वेळ काळ नाही. अधर्म वाढल्यानंतरच धर्मयुद्ध करण्यासाठी कुणीतरी जन्माला येतो. धर्मयुद्ध झाले नाही तर स्वधर्म आणि कीर्ती याचा नाश होऊन ब्रह्मांडात हाहा:कार माजेल, धर्मयुद्ध हे प्रत्येकाचे कर्मयुद्ध आहे. कर्म बंधन तोडून धर्म युद्धाचे साधनाचा अंगीकार केल्यास कोणतेही भय राहत नाही. ईश्वरी संकेत जाणणाºया व्यक्तीला मोठा पाण्याचा साठा मिळाला तरी ग्लासभर पाण्याची जेवढी गरज आहे, तेवढीच गरज ब्रह्म जाणणाºया व्यक्तीला वेद शास्त्रांची आहे. परमार्थाच्या मार्गात वेदशास्त्र नसेल तर परमार्थाच्या अर्थाला महत्त्व राहणार नाही. परमार्थाच्या मार्गावर जाणे हाच मनुष्य प्राण्याचा खरा धर्म आहे.- नाना महाराज कुलकर्णी, पिंप्राळा.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव