शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:08 IST

तातडीने मागविले अहवाल

जळगाव : जिल्ह्यात रविवारी मॉन्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.जिल्ह्यात रविवारी चोपडा, यावल या तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे केळीसह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना मिळताच त्यांनी या नुकसानीची तातडीने पाहणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.आठ हजार शेतकऱ्यांना १५ कोटींची भरपाईजिल्ह्यात गेल्या वर्षी जून २०१८ मध्ये वादळी वारा व अवेळी पावसामुळे केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी केळी उत्पादक शेतकºयांना १५ कोटी ८२ लाख रुपयांची मदत देण्यास सोमवारी मान्यता दिली आहे. ही रक्कम तातडीने जिल्हाधिकाºयांकडे वर्ग करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.गेल्या वर्षी १ जून ते २१ जून २०१८ या कालावधीत जळगाव जिल्ह्यात वादळी वाºयासह पाऊस झाला होता. त्यामुळे केळी पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना १५ कोटी ८२ लाख ५३ हजार रुपयांचा निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे ८०१३ शेतकºयांंना ही रक्कम मिळणार आहे. शेतकºयांना ही रक्कम तातडीने देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.नुकसानीची माहिती प्रपत्रात भरण्याचे आवाहनजिल्ह्यात रब्बी हंगाम २०१८ साठी फळपीकांसाठी हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. २ जून, २०१९ रोजी जळगाव, यावल व चोपडा या तालुक्यांमध्ये वादळी वाº्यांमुळे झालेल्या केळी पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत कंपनीला सुचित करण्यासाठी शेतकºयांनी प्रपत्र-2 भरुन ते ईमेल आयडीवर स्कॅन करुन पाठवावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.गावात जाऊन होणार पंचनामेजिल्हाधिकाºयांनी महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोमवार सकाळपासूनच महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी नुकसान झालेल्या गावांमध्ये जाऊन नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.मॉन्सूनपूर्व पावसामुळे ज्या शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकºयांंना शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्यात येईल तसेच ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला असेल त्यांना नियमानुसार भरपाई मिळण्यासाठीचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात येईल, तर ज्या शेतकºयांनी पीक विमा काढलेला नाही.मात्र, त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकºयांना शासनामार्फत भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.सहकार राज्यमंत्र्यांनी केली पाहणीरविवारी कठोरा, सावखेडा, किनोद व गाढोदा परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले. सोमवारी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी या गावांमध्ये नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी चर्चा केली. नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकºयांना आर्थिक मदतीचे आश्वासन त्यांनी दिले.

टॅग्स :Jalgaonजळगाव