महाराष्ट्र शासनाने २०२०-२१ साठी माझी ‘वसुंधरा अभियान’ राज्यात राबविले. या स्पर्धेसाठी पहूर पेठ ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय अंतिम मूल्यांकन शासनाच्या राज्यस्तरीय समितीकडून व्हर्च्युअल टुरच्या माध्यमातून गेल्या आठवड्यात ऑनलाइन घेण्यात आले. उल्लेखनीय कामगिरी करणारी व राज्यस्तरावर पोहोचणारी जामनेर तालुक्यातील पहिली पहूर पेठ ग्रामपंचायत ठरली आहे. व्हर्च्युअल टुरद्वारे पेठ ग्रुप ग्रामपंत सरपंच नीता रामेश्वर पाटील यांनी वसुंधरा अभियानांचे सादरीकरण केले व स्थानिक ग्रामपंचायत समिती सदस्यांनी सेंद्रीय खत प्रकल्प, बायोगॅस, वृक्षलागवड, परस बाग, जीवामृत, जलसंवर्धन, सौरऊर्जा, रेन हार्वेस्टिंग, दुचाकी चार्जिंग पॉइंट या ठिकाणी गेल्या आठवड्यात ऑनलाइन व्हर्च्युअल टुरद्वारे राज्यस्तरीय समितीकडे सादरीकरण केले होते.
पहूर ग्रामपंचायतीला ‘माझी वसुंधरा’ पुरस्काराची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST