शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संकूल सुरू, रस्ते बंद; आॅनलाईन डिलिव्हरीला अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:22 IST

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील लहान-मोठे व्यापारी संकूल सोमवार, २० जुलैपासून उघडले. यात छोट्या संकुलांमधील ...

जळगाव : कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेले शहरातील लहान-मोठे व्यापारी संकूल सोमवार, २० जुलैपासून उघडले. यात छोट्या संकुलांमधील दुकाने सुरू झाली, मात्र महात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट या मोठ्या संकुलांमधून केवळ आॅनलाईन विक्रीला परवानगी असली तरी बाजारपेठेतील रस्ते बंद करून ठेवण्यात आल्याने विक्रेत्यांनाही माल पोहचविताना अडचणी येऊ शकतात तसेच सम-विषम बाबत संभ्रम असल्याने मोठ्या संकुलांमधील दुकाने दुपारी काही वेळ उघडून साफसफाई करण्यात येऊन पुन्हा बंद करण्यात आली. त्यामुळे संकुल सुरू, रस्ते बंद व आॅनलाईन पद्धतीला फारसा प्रतिसाद न मिळणे, अशा स्थितीमुळे दोन्ही प्रकारच्या संकुलांमधील विक्रेत्यांचा व्यवसायाने अद्यापही गती घेतली नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून शहरातील व्यापारी संकुले बंद असल्याने व्यापाऱ्यांसमोर संकट उभे राहण्यासह अर्थचक्रही मंदावले. चार महिन्यांच्या काळात महत्त्वाचे सण, उत्सव निघून गेल्याने माल भरून ठेवला असतानाही व्यवसाय करू शकत नसल्याने व्यापारी बांधव हतबल झाले होते. इतर व्यवसायांना परवानगी मिळत असताना संकुलांमधील व्यापारी बांधवांसह विविध व्यापारी संघटनांनी ही संकुले सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला.साफसफाई करून दुकाने पुन्हा बंदमहात्मा फुले मार्केट, सेंट्रल फुले मार्केट, गोलाणी मार्केट, बी.जे. मार्केट, महात्मा गांधी मार्केट, आंबेडकर मार्केटमधील दुकानांना दुपारी १२ ते ४ दरम्यान, होम डिलिव्हरी किंवा आॅनलाईन व्यवसाय करता येणार असल्याने या ठिकाणी पाहणी केली असता दुपारी साडेबारा वाजेपर्यंतही दुकाने उघडलेली नव्हती. त्यानंतर काही दुकाने उघडण्यात आली. मात्र अनेकांनी साफसफाई करून दुकाने पुन्हा बंद केली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव