शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून कोविड रुग्णालयात आॅक्सिजन पाईप लाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 22:02 IST

डॉक्टरांच्या प्रयत्नाने चोपडा येथील स्तुत्य कार्य, आणखी मदत जमा करुन विविध सुविधा उपलब्ध करण्याचा तरुणांचा मानस

चोपडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात आॅक्सिजनची व्यवस्था आहे. परंतु रुग्णाच्या बेडला जोडणारी संयुक्त आॅक्सिजन पाईप लाईन नसल्याने बऱ्याच रुग्णांना जळगाव येथे किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये हलवावे लागत असल्याने कोरोना रुग्णांना आॅक्सिजन पुरवठा हा मेडिसिनपेक्षाही महत्त्वाचा असतो, ही बाब लक्षात घेता येथील डॉक्टरांच्या प्रयत्नाने लोकसहभागातून आॅक्सिजन पाईप लाईनचे काम हाती घेतले आहे.नुकतीच चोपड्याच्या डॉक्टरांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झूम अ‍ॅपवर बैठक झाली. त्यात डॉ. दीपक पाटील, डॉ.दिलीप पाटील, डॉ.लोकेंद्र महाजन, डॉ. विनीत व डॉ. अमित हरताळकर, डॉ. भाटिया, डॉ. देशपांडे, डॉ.नरेंद्र शिरसाठ यासाऱ्यांनी पेशंटची संख्या कमी करण्याच्या उपायासोबत रुग्ण चोपडा येथेच कसा बरा होईल यावर भर दिला.यावेळी डॉ. पंकज पाटील यांनी सांगितले की, चोपडा कोविड सेंटरमध्ये लोकसहभागातून आॅक्सिजन स्तर तपासणी आणि प्रत्येक बेडला आॅक्सिजनची व्यवस्था जर झाली तर कोरोनाग्रस्त रुग्णांना जळगाव येथे व बाहेर पाठवण्याची शक्यता कमी होईल. त्यासाठी आॅक्सिजन पाईप लाईनची व्यवस्था होणे गरजेचे आहे असे सुचवले.एक असा विचार आला की, प्रत्येक ठिकाणी सरकार पूर्ण पडणार नाही. केंद्राला संपूर्ण देशाची व राज्यसरकारला देखील संपूर्ण राज्याची काळजी घ्यायची आहे, या सोबत सरकारचे उत्पन्नाचे स्त्रोतदेखील कमी झाले आहेत. म्हणूनच आॅक्सिजनची व्यवस्था लोकसहभागातून करण्याचा विचार पुढे आला. यानंतर अनेकांनी मदतीचा हात देऊन एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये जमा झालेत. ते तहसीलदार अनिल गावीत यांच्याकडे सुपुर्द केलेत. कोविड रुग्णालय अर्थात उपजिल्हा रुग्णालयात कामास सुरुवात झाली असून जास्तीत जास्त रुग्णांना आॅक्सिजन पुरवठा करता येईल, अशी व्यवस्था होत आहे.कोरोनामुक्त चोपडा अभियानातील कार्यकर्ते या रुग्णालयातील सेवा सुविधांसाठी परिश्रम घेत आहे. त्यासाठी मयूर शिंदे, रमाकांत सोनवणे, सी. एस. पाटील, विपीन बोरोले, कुलदीप पाटील, ऋषीकेश पाटील मेहनत घेत आहेत.