शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

...अन् मध्यरात्री २ वाजता उपलब्ध झाला ऑक्सिजन बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मध्यरात्रीचे २ वाजलेले अन् फोनची रिंग वाजते... हॅलो साहेब, अमळनेर येथून बोलतोय, आमच्या रुग्णासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मध्यरात्रीचे २ वाजलेले अन् फोनची रिंग वाजते... हॅलो साहेब, अमळनेर येथून बोलतोय, आमच्या रुग्णासाठी ऑक्सिजन बेड खूप आवश्यक आहे, काहीही करा, बेड उपलब्ध करून द्या आणि फोन कट होतो. दुसऱ्याच क्षणी अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून जिल्हाभरातील बेडची स्थिती जाणून घेतली जाते आणि पंधरा मिनिटांत एरंडोल येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याची माहिती संबंधिताला दिली जाते. काही वेळातच रुग्णाला बेड उपलब्ध होतो आणि पुढील उपचाराला सुरुवात होते. अभाविपच्या कार्यतत्परतेमुळे वेळीच उपचार मिळाल्यामुळे रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

कोरोना विषाणूचा कहर वाढला आहे. बाधितांची संख्या वाढल्यामुळे सध्या कुठे ऑक्सिजनचा तुटवडा, तर कुठे बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना वेळीच उपचार मिळावेत म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कोरोना हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात रुग्णाला व त्याच्या नातेवाइकांना मार्गदर्शन केले जाते. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री २ वाजता हेल्पलाइनच्या फोनची रिंग वाजली. अभाविपच्या कार्यकर्त्याने फोन उचलताच, समोरून घाबरलेल्या आवाजात एका कोरोनाबाधित रुग्णाचे नातेवाईक बोलत असून, आम्ही अमळनेर येथे राहतो. आमच्या रुग्णाला ऑक्सिजन बेडची आवश्यकता आहे. आम्हाला मदत करा, अशी विनंती केली. त्यावर कार्यकर्त्याने त्या माणसाला धीर देत, काळजी करू नका, थोडा वेळ थांबा, असे सांगितले.

व्यवस्था करतो अन् कॉल कट झाला

विनंती करणाऱ्या व्यक्तीचा फोन कट होताच, अभाविपच्या कार्यकत्याने मध्यरात्री ऑक्सिजन बेड कुठे शिल्लक आहेत, याची माहिती घेतली. अखेर पंधरा मिनिटांच्या प्रयत्नानंतर एरंडोल येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. कार्यकर्त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीस कॉल करून एरंडोल येथे बेड उपलब्ध असल्याची माहिती दिली. संबंधितांचा संपर्क क्रमांकसुद्धा दिला. संबंधित रुग्णालयातूनदेखील प्रतिसाद मिळताच, मध्यरात्रीच बाधित रुग्णाला एरंडोल येथे उपचारार्थ दाखल करण्‍यात आले. दरम्यान, रुग्णाची प्रकृती स्थिर असून, अभाविपच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.