शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:06 IST

जळगाव : मध्यप्रदेशात झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आला आहे.  ...

जळगाव : मध्यप्रदेशात झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आला आहे. 

अनेक दिवसांच्या दडीनंतर व असह्य अशा उकाड्यात दिलासा देत पावसाने जळगाव शहरात दुपारी हजेरी लावली होती़ अर्धा तास मुसळधार तर काही वेळ रिमझीम पाऊस झाला़ दुपारनंतर दिवसभर ढगाळ वातावारण होते़ त्यानंतरही रात्रभर झालेल्या पावसाने सर्वांना दिलासा मिळाल आहे.शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली़ काही काळ मुसळधार तर काही काळ रिमझीम असा दुपारी चार वाजेपर्यंत थांबून थांबून पाऊस सुरू होता़ तसेच रात्री साडे नऊच्या सुमारासही पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते़ दुपारी आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत तारांबळ उडाली होती़ यासह रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनधारकांचीही तारांबळ उडाली होती़ दरम्यान, गेल्या आठवडाभरापासून प्रचंड उकाडा जाणवत असून शहरवासीय घामाघूम झालेले होते़ त्यातच पावसाने हजेरी लावली होती़ दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारवा असल्याने या उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला होता़ रिमझीम पावसाने पिकेही तग धरतील मात्र, आणखी मुसळधार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे़रिमझीम पावसातही बत्तीगुलरात्री साडे नऊ वाजता पावसाला सुरूवात झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला होता़ रात्री उशीरापर्यंत हा वीजपुरवठा सुरळीत झालेला नव्हता़ त्यामुळे शुल्लक पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने महावितरणच्या कारभारावरही नाराजी व्यक्त करण्यात येत होती़नशिराबादला आठवडे बाजारात तारांबळनशिराबाद : अचानक आलेल्या पावसामुळे शुक्रवारच्या आठवडे बाजारात सर्वांचीच एकच तारांबळ उडाली.पावसाने दुपारी काही वेळ चांगलीच हजेरी दिली.त्यामुळे दिलासा मिळाला असला तरी विक्रेते व ग्राहकांची मात्र एकच धावपळ झाली. शुक्रवारी येथे आठवडे बाजार भरतो. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सकाळी काही प्रमाणात हलक्या सरी होत्या. दुपारी मात्र पाऊस दिलासा दायक बरसला. त्यामुळे बाजारात सर्वत्र चिखल व पाणी पाणीच झाले होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव