शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कुत्र्याला हुसकावून लावत चोरट्याने लांबविले पारोळ्यातील अंबिका डेअरीतून १६ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 17:22 IST

जळगाव जिल्ह्यात चोरी आणि घरफोड्यांचे सत्र सुरुच

ठळक मुद्देचोरट्याने लांबविली १६ लाख २७ हजार रुपयांची रक्कमचोरीचा घटनाकक्रम सीसीटीव्ही कॅमेºयात कैदचोरीची माहिती मिळाल्यानंतर डेअरीमालकाला आली भोवळ

आॅनलाईन लोकमतपारोळा,दि.२५ : पारोळा-अमळनेर रस्त्यावरील शनिमंदिरा जवळील अंबिका दूध डेअरीत पहाटे चार वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरट्याने कापटाच्या तिजोरीचे लॉक तोडून त्यातून १६ लाख २७ हजार रुपयांची रक्कम लांबविली. या चोरीबाबत डेअरीचे मालक गोपाल महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे.दिनांक २५ रोजी पहाटे ४.२३ वाजता एक अज्ञात चोरटा बिना नंबरची मोटारसायकल ने आंबिका डेअरीत प्रवेश केला. परंतु त्या मागे कुत्रे लागल्याने तो पळून गेला. पुन्हा पाच मिनिटांनी लोखंडी रॉड घेऊन आला आणि कुत्र्याला पळून लावत त्याने दूध डेअरीच्या कार्यालयात जाऊन ज्या कपाटात पैसे ठेवले होते त्या कपाटाचे लॉक तोडून पैसे घेऊन पसार झाला. या चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेºयात टिपल्या गेल्या आहेत. पण त्याने सर्व चेहरा रुमालाने बांधलेला आहे डोळ्यावर गॉगल आहे म्हणून ओडखला जात नाहीया चोरी ची बातमी कळताच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, अमळनेर विभागाचे उपअधीक्षक रऊप शेख, पोलीस निरीक्षक एकनाथ पाडले यांनी घटनास्थळी भेट दिली. दूध डेअरीचे मालक गोपाल महाजन यांना डेअरीत चोरी झाल्याचे कळल्यावर त्यांना भोवळ आली होती. चौथ्या शनिवारी बँकेला सुटी असते. त्यामुळे एक दिवस आधी दूध विक्रेत्यांना पेमेंट देण्यासाठी त्यांनी तिजोरीत पैसे ठेवले होते.डेअरीमालक गोपाल महाजन यांनी श्वान पथक बोलविण्याची तसेच कपाटावरील चोरट्याच्या हाताचे ठसे घेण्याची मागणी केली. मात्र संध्याकाळी ६ वाजेपर्यंत श्वान पथक किंवा ठसे तज्ज्ञ आलेले नव्हते. घटनास्थळाचा पंचनामा पोलीस निरीक्षक एकनाथ पाडले यांच्यासह कर्मचाºयांनी केला. 

टॅग्स :RobberyदरोडाParolaपारोळा