शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

थकबाकी १६७ कोटी

By admin | Updated: July 28, 2014 13:56 IST

वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडे कृषिपंपांची १६७ कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाने माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

बोरद : शेतकर्‍यांकडून माफीची अपेक्षा
बोरद :वीज वितरण कंपनीच्या शहादा उपविभागांतर्गत चार तालुक्यातील शेतकर्‍यांकडे कृषिपंपांची १६७ कोटी रुपयांची थकबाकी राज्य शासनाने माफ करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 
राज्य शासनाने कृषी संजीवनी योजनेत कृषिपंपधारकांना निम्मे वीज बिल व त्यावरील वीज बिल माफ करण्याची नुकतीच घोषणा केली आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या अखत्यारीतील शहादा, अक्कलकुवा, धडगाव व तळोदा तालुक्यातील २0 कृषिपंपधारक शेतकर्‍यांनी वीज कंपनीकडून देण्यात आलेली १00 टक्के रक्कम माफ करून शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा द्यावा, या बिलांच्या माफीनंतर शेतकर्‍यांना नियमित कृषिपंप बिल द्यावे, अशी मागणी शेतकर्‍यांची आहे. वीज कंपनीने दर महिन्याला बिले देऊन शेतकर्‍यांकडून रितसर बिल वसुलीची मागणी करूनही कारवाई करण्यात आलेली नाही. 
वीज वितरण कंपनीने बिले दिलेल्या शहादा, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा या चारही तालुक्यातील शेतकर्‍यांकडे १६७ कोटी रुपयांची वीज बिले थकलेली आहेत. शहादा तालुक्यात सर्वात जास्त १२0 कोटी रुपयांची वीज बिल थकबाकी आहे. परंतु शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यात गेल्या काही काळात खालावलेल्या पाणी पातळीमुळे शेतकर्‍यांनी आपले पंप या काळात बंद ठेवले होते. परंतु वीज कंपनीने बंद काळातील बिले देऊन बिलाची रक्कम फुगवली आहे. शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना गेल्या तीन वर्षात गारपीट, अवकाळी व अतवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. परिणामी शेतकर्‍यांच्या खरीप व रब्बी हंगामाच्या शेती उत्पादनांना र्मयादा आलेली आहे. यंदाही लांबलेल्या पावसाळ्यात सहा तास चालणार्‍या वीजपंपांद्वारे शेतकर्‍यांनी कापूस, केळी, पपई, सोयाबीन व उसाचे संगोपन केले आहे. यामुळे शेतकर्‍यांचे वीज बिल वाढीव येण्याची चिन्हे आहेत. परंतु पावसाचा लपंडाव सुरू असल्याने शेतकर्‍यांना उत्पन्नाची शाश्‍वती नाही.
राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेऊन चारही तालुक्यातील कृषिपंपधारक शेतकर्‍यांकडे थकीत असलेली रक्कम निवडणूक आचारसंहितेच्या आधी माफ करावी, अशी अपेक्षा चारही तालुक्यातील शेतकर्‍यांकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
तीन वर्षांपासून उत्पन्न घटले
■ शहादा विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागीय क्षेत्रात शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या तालुक्यांचा समावेश आहे. यात २0 हजार ३८४ कृषिपंपधारक शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांकडे १६७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. शहादा तालुक्यात १२0 कोटी, तळोदा तालुक्यात १९ कोटी, धडगाव तालुक्यात १२ कोटी, अक्कलकुवा तालुक्यात १६ कोटी रुपये शेतकर्‍यांकडे थकीत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शहादा तालुक्यात पाणी पातळी खालावली होती. परिणामी शेतकर्‍यांचे कृषिपंप बंद झाल्यामुळे वीज वापर बंद झाला होता. तरीही वीज बिलात जादा वापर दाखवल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. चारही तालुक्यात गेल्या तीन वर्षात पर्जन्यमानाची अनियमितता, पाणीपातळी, भारनियमन यामुळे शेती उत्पन्नात घट आली आहे. शेतकर्‍यांकडे थकलेल्या वीज बिलांचा भरणा न झाल्यास वीज कंपनी कर्मचारी व शेतकरी यांच्यात वाद होतात. यातून अनेकवेळा मोठी भांडणे झाली आहेत.