शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांच्या याद्या चौकाचौकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 12:43 IST

पंधरा दिवसांची मुदत

ठळक मुद्देअन्यथा जप्तीची कारवाई, ४०० बडे थकबाकीदार रडारवर

जळगाव : मनपा मालमत्ताकराची रक्कम थकीत असलेल्या ४०० बड्या थकबाकीदारांच्या नावांची यादी बुधवारी मनपाकडून चौकाचौकात प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रभागनिहाय चार याद्यांचे बॅनर शहरातील अनेक भागांमध्ये लावण्यात आले असून, सर्व थकबाकीदारांनी आपल्याकडील मालमत्ताकराची थकीत रक्कम पंधरा दिवसाच्या आत भरण्याचे आदेश मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.मनपाची डिसेंबर अखेरपर्यंत ५५ टक्के वसुली झाली असून, उर्वरित वसुली करण्यासाठी मनपाकडे केवळ तीन महिन्यांचा काळ शिल्लक असल्याने जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी मनपाकडून विशेष प्रयत्न होत आहेत. ज्या थकबाकीदारांकडे वर्षभरापासून लाखापेक्षा अधिक थकबाकी आहे.अशांचीच यादी जाहीर करण्यात आलेली आहे. चारही प्रभागातून प्रत्येकी १०० थकबाकीदारांचे नावे सार्वजनिक करण्यात आले आहे.मोठ्या थकबाकीदारांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या पंधरा दिवसात रक्कम न भरल्यास मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे.तसेच शहरातील ४ हजार ५०० थकबाकीदारांना देखील जप्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या असून, त्यांना देखील पंधरा दिवसांची मूदत देण्यात आली आहे.दरम्यान, मनपा प्रशासनाच्या या अजब फंड्याची शहरात जोरदार चर्चा असून कारवाईच्या भीतीमुळे थकबाकीदारांचेही धाबे दणाणले आहे. या फलकामुळे किती वसुली होते, हे येणारा काळच सांगले.बाकी भरणाऱ्यांना मोफत नळ कनेक्शनअमृत अंतर्गत ज्या भागांमध्ये पाणी पुरवठा योजनेचे काम झाले आहे. अशा भागात पाणी पुरवठ्याचे नळ कनेक्शन मनपाकडून दिले जात आहे. दरम्यान, ज्या नागरिकांनी थकबाकी रक्कम भरली आहे अशांना मनपाकडून मोफत नळ कनेक्शन दिले जाणार असल्याची माहिती मनपाचे प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांनी दिली आहे. तसेच ज्या थकबाकीदारांनी थकीत रक्कम भरली नाही अशा नागरिकांना नळ कनेक्शन दिले जाणार नसल्याची माहितीही बोरोले यांनी दिली.