शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘अनाथांच्या आई’नं लिहितं केलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:53 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत साहित्यिक डी.बी.महाजन....

गत ३५ वर्षांपासून रोजनिशी लिहिण्याची सवय आहे़ ‘अनाथांच्या आई’ असलेल्या डॉ.सिंधूताई सपकाळ यांच्या सहवासातील आठवणी लिहून काढल्या़ मला भावलेल्या माई, तिचं वेगळंपण जगासमोर यावं म्हणून मी हे अनुभव मित्रवर्य दिनेश दगडकर, रामचंद्र पाटील आणि विनय यांना कथन केले़ या अनुभवांना शब्दबद्ध करण्याचा त्यांनी आग्रह धरला़ एके दिवशी माईना फोन करून माझी भावना व्यक्त केली़ माई पटकन म्हणाली, ‘लिही बाळा लिही. लिहून तुझी मनाची कवाडं उघडणार असतील आणि मन मोकळं होणार असेल, तर याकामी माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठिशी आहे़’माईच्या या आशीर्वचनानंतर मी लेखनास प्रारंभ केला़ त्यातूनच ‘अनाथाची आई’ या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे़ या लेखन कार्यात माझी पत्नी निर्मला हिचं पाठबळ मिळालं आहे़ मार्इंचा २५ वर्षांचा सहवास आणि या मातेचा स्पर्श मला प्रेरणा आणि ऊर्जा देत होता़ या भावविश्वातील खऱ्या प्रेरणास्त्रोत माईच़ त्यांच्या दीर्घ सहवासातूनच माझं वैचारिक आणि भावनिक विश्व समृद्ध झालेलं आहे़व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस अनामिक मद्यपी या जागतिक संघटनेच्या तत्त्वांचा प्रचार व प्रसार व्हावा या प्रांजल हेतूनं काही लेख, मद्यप्यांच्या सत्य कहाण्या शब्दांकित करून नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या आहेत़नामोल्लेख केलेले सर्व माझे मित्र, सहकारी आणि माझ्या माई यांच्या लेखन प्रेरणेतूनच लिखाण करणं शक्य झालेलं आहे़यापूर्वी सुमारे २५-३० वर्षांआधी मार्इंचं स्वलिखित ‘मी वनवासी’ हे चरित्रपर पुस्तक लिहिलेलं होतं. ते माझ्या वाचनात आलं. त्यातून मार्इंचा असलेला संघर्ष आणि विधायक कार्य ध्यानात आलं. त्यामुळे ती उर्जा घेऊन मीदेखील मार्इंच्या आयुष्यावर काही तरी लिहावं, असं वाटत होतं. त्या पुस्तकाची प्रेरणादेखील मला लिहितं करण्यासाठी प्रेरीत करून गेली. अनाथांची आई या पुस्तकाचे भाषांतर उर्दू आणि गुजराथी या भाषेत झालेली असून, कानडी भाषेत अनुवाद सुरू आहे. त्यावेळी माई असं म्हणते, की ‘मी वनवासी हा माझा संघर्ष असून, माझ्या मानस पुत्रानं लिहिलेलं अनाथांची आई हे पुस्तक माझा उत्कर्ष आहे.’-डी.बी.महाजन, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव