शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
3
NASA : नासाचा मोठा निर्णय!इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
4
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
5
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
6
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
7
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
8
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
9
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
10
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
11
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
12
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
13
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
14
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
15
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
16
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
17
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
18
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
19
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
20
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."

जळगाव येथे 5 जानेवारीपासून बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 12:42 IST

16वा बालगंधर्व संगीत महोत्सव

ठळक मुद्देसुफी व गझल गायनाने सुरुवात संतूर व सतारीची  जुगलबंदी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 10- वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे 5 ते 7 जानेवारी दरम्यान कांताई सभागृहात 16 व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा पहिल्यांदाच महोत्सवाची सुरुवात मुंबई येथील पूजा गायतोंडे यांच्या सुफी व गझल गायनाने होणार असल्याची माहिती   प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक चांदोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चांदोरकर प्रतिष्ठानचे अरविंद देशपांडे, शरदचंद्र छापेकर, विनायक टेंभूर्णे, दिनेश तायडे आदी उपस्थित होते. महोत्सवाचे उदघाटन 5 रोजी जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापौर ललित कोल्हे, एम.व्यंकटेश आदी उपस्थित राहणार आहेत.  पहिल्या दिवशी दुस-या सत्रात उज्जैन येथील भगिनी संस्कृती व प्रकृती वहाने  संतूर व सतारीची  जुगलबंदी होईल.   तर दुस-या दिवशी पहिल्या सत्रात सारेगमप स्पर्धेची विजेती अंजली गायकवाड व नंदिनी गायकवाड या दोन्ही बहिणी शास्त्रीय, उपशास्त्रीय व नाटय़गीतांची मैफल सादर करतील.  दुस:या सत्रात नृत्यांगणा अमिरा पटवर्धन  कथ्थक नृत्याविष्कार सादर करतील. तिस:या दिवशी सकाळी 7 वाजता गांधी उद्यानात शास्त्रीय गायक आनंदगंधर्व पंडित आनंद भाटे यांची मैफल होईल.  तर  दिल्लीचे उस्ताद अर्शद खान ‘इसराज’ वादन करतील.  महोत्सवाचा समारोप तबला वादक पंडित कालिनाथ मिश्रा व त्यांचे चिरंजीव सत्यप्रकाश मिश्रा यांच्या तबला जुगलबंदीने होईल. सूत्रसंचालन अभिनेत्री व निवेदक दिप्ती बर्वे या करणार आहेत.