शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना पुढाकार घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 19:00 IST

आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनचे जळगावात द्विवार्षिक अधिवेशन

ठळक मुद्देनवीन कार्यकारिणी निवडसमस्या सोडवण्यासाठी संघटना अग्रेसर

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन ग्रुप ‘सी’ ( एन.एफ.पी.ई ) जळगाव विभागीय शाखेचे द्वैवार्षिक अधिवेशन ११ मार्च रोजी शहरातील मुख्य टपाल कार्यालयात झाले. यामध्ये नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात येऊन कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्याविषयी पदाधिकाºयांनी ग्वाही दिली.या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष आर. एस. धर्माधिकारी होते तर प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ युनियनचे अध्यक्ष एम.एफ. हसन, सचिव लक्ष्मण माळी, एन. बी. महाजन, एम. एन. पाटील, भूषण पाटील, एस. ई. बडगुजर, के. आर. भारुटे, लक्ष्मीकांत ठाकूर, सतीश पाटील उपस्थित होते. या वेळी पल्लेश देशमुख, विनोद मीना, सुमेध बनसोड, प्रशांत पाटील, विशाल पाटील, चेतन निकम, सचिन ठाकूर, चेतन पाटील, प्रशांत पाटील या नवीन सभासदांचा सत्कार करण्यात आला.समस्या सोडवण्यासाठी संघटना अग्रेसरदिल्ली येथे नुकतेच झालेले पाच दिवसीय धरणे आंदोलन, बंगलुरू येथील आॅल इंडिया अधिवेशनाच्या स्वरूपाविषयी तसेच स्थानिक पातळीवर सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांबाबत लक्ष्मीकांत ठाकूर यांनी माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात धर्माधिकारी यांनी कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी संघटना नेहमी अग्रेसर असते व या पुढेही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.नवीन कार्यकारिणी निवड२०१८-२०२० या वर्षासाठी युनियनची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये संघटनेच्या अध्यक्षपदी आर. एस. धर्माधिकारी, सचिवपदी लक्ष्मीकांत ठाकूर, सहसचिव म्हणून मोहन सपकाळे आणि कोषाध्यक्षपदी सतीश पाटील यांची निवड करण्यात आली.सूत्रसंचालन सतीश पाटील यांनी केले तर लक्ष्मीकांत ठाकूर यांनी आभार मानले. डी. बी. इंगळे, एम. एच. दुसाने, श्रीनिवास ठाकूर, संदीप पाटील, नितीन राऊत, गणेश चौधरी, रवी पाटील यांनी परिश्रम घेतले.व्ही. एस. लोखंडे, बी.जे. महाजन, डी. एन. ठाकूर, सारंग जैन, भांडारकर, मनोज करनकाळ, तुषार महाजन, बी. ए. अहिरे, दिनेश ठाकरे, डी.एस. साळुंखे, संतोष जालनकर, मोहन सपकाळे, पी. ए. जगताप, मंगला पवार, व्ही. ए. शिंदे, कल्याणी पाटील, पल्लवी थोटे, शाहीन तडवी, सुरेश चौधरी, अशोक सपकाळे, हेमंत ठाकूर, मुंजा चव्हाण, गोपाल पाटील, उमेश रहान, विनोद चौधरी, चेतन ठाकूर, विजय ठाकूर, विठ्ठल तिव्हाणे, अर्जुन माटोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव