शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल अपहार प्रकरणी चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:03 IST

लाभार्थ्यांना न्यायाची अपेक्षा

बिडगाव, ता. चोपडा : येथून जवळच असलेल्या वरगव्हाण शेवरे ग्रुप ग्रामपंचायतच्या शेवरे येथील आदिवासी घरकूल लाभार्थींच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांची रक्कम परस्पर काढल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश चोपडा पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी बी.एस.कोसोदे यांनी दिले आहेत. त्यात ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देत प्रकाशित बातमीचाही उल्लेख केला आहे.शेवरे बु.येथील आदिवासी बांधवांना २००५ ते २०१८ या कालावधीत शासनाने इंदिरा गांधी घरकूल योजना, राजीव गांधी आवास योजना, शबरी घरकूल योजना, पंतप्रधान आवास योजना या योजनांमधून घरकुले मंजुर झाली होती. त्यासाठी २५ ते ३० लाखांचा निधी खर्चही केला आहे. मात्र तरीही गावात आज मितीस एकही घरकुल पूर्ण झाले नाही हे विशेष. बहुतेक लाभार्थ्यांना नाममात्र रक्कम देऊन त्यांच्या नावाने पूर्ण रक्कम काढून अपहार झाल्याच्या तक्रारी आहेत. एवढे नव्हे तर काही लाभार्थींचे गावात अस्तीत्वच नसताना त्यांचे नावे आलेल्या घरकुलांचा पायाही न खोदता परस्सर निधी हडप केल्याची तक्रार दीपक पाटील यांनी केली होती.या संदर्भात ‘लोकमत’मध्ये ‘आदिवासींच्या घरकूल निधीवर डल्ला’ या मथळ््याखाली वृत्त १० फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले व ही सत्यता बाहेर आणली होती. एवढा मोठा गलथान कारभार हा सरपंच, ग्रामसेवक व शाखा अभियंत्यांच्या मिलीभगत शिवाय होऊच शकत नसल्याने प्रशासनाचीही दिशाभूल झाली असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे.या अपहारप्रकरणी ‘लोकमत’ने पाठपुरावा केला. या प्रकारणाची चोपडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कोसोदे यांनी दखल घेत सदरील प्रकरणाची चौकशी आदेश काढून त्यात म्हटले आहे की, ‘लोकमत’ला ‘आदिवासींच्या घरकूल निधीवर डल्ला’ असे वृत्त १० फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले होते. त्याअनुषंगाने प्रत्यक्ष वरगव्हान गावी जाऊन घरकुल प्रकरणी कागद पत्रांची पडताळणी करून वस्तुनिष्ठ चौकशी करून अहवाल सादर करावे अशा आदेशाचे पत्र सहाय्यक गटविकास अधिकारी एस.बी.कोळी व शाखा अभियंता डी.आर.डोके यांची चौकशीसाठी नेमणूक करून दिले आहेत. यामुळे शासनाने लाभ देऊनही त्या निधीत अपहार करत लाभापासून वंचीत असलेल्या आदिवासी बांधवांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘लोकमत’ने हा विषय लावून धरल्याने लोकमतचे आभारही व्यक्त केले जात आहेत.घरकूल निधीच्या अपहार प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेऊन दोन अधिकाºयांची चौकशीसाठी नेमणूक केली आहे. त्याबाबतचा अहवाल येताच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.- बी.एस. कोसोदे, गटविकास अधिकारी, पं.स.चोपडा

टॅग्स :Jalgaonजळगाव