शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

६00 कामगारांबाबत निर्णय घेण्याचे आदेश

By admin | Updated: August 28, 2014 15:07 IST

महापालिकेतील २१८ बदली व ३७५ नवीन सफाई कामगारांची पदे मंजुरीबाबत ३१ जानेवारी २0१५ च्या आत राज्य शासनाला निर्णय घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले.

धुळे : महापालिकेतील २१८ बदली व ३७५ नवीन सफाई कामगारांची पदे मंजुरीबाबत ३१ जानेवारी २0१५ च्या आत राज्य शासनाला निर्णय घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने आज दिले, अशी माहिती अँड.एन.एल. चौधरी यानी दिली.

महापालिकेतील राजू शिव अंकुशे व इतर २७ बदली कामगारांनी कायम सेवेत सामावून घेण्यासाठी १५ जानेवारी २0१३ रोजी उपोषण केले होते. त्या उपोषणाला अनुसरून २१ मार्च २0१३ रोजी महापालिका आयुक्तांनी २१८ बदली कामगारांना सेवेत सामावून घेण्यासाठी २१८ पदांना मंजुरी मिळावी तसेच ३७५ नवीन सफाई कामगारांच्या पदांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. परंतु शासनाने अद्यापपर्यंत या प्रस्तावावर कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. म्हणून राजू अंकुशे व इतर २७ बदली कामगारांनी अँड. नितीन चौधरी यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्रमांक ५९९४/२0१४ दाखल केली होती. 
या याचिकेवर २७ रोजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा व आर.एम. बोर्डे यांच्या खंडपीठासमोर कामकाज झाले. त्यांनी राज्यशासनाला ३१ जानेवारी २0१५ च्या आत महापालिकेने पाठविलेल्या २१८ बदली कामगारांची पदे व ३७५ नवीन सफाई कामगारांची पदे मंजुरीबाबत निर्णय घेण्याचे आदेश पारित केले. धुळे शहराचा चौफेर विस्तार वाढून लोकसंख्येतही वाढ झाली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत स्टाफींग पॅटर्ननुसार सफाई कामगारांची संख्या फारच कमी व अपूर्ण आहे. संपूर्ण शहरासाठी ३५0 ते ४00 सफाई कामगारांची आवश्यकता आहे. साफसफाई पूर्ण होत नसल्याने तसेच कचरा पूर्णपणे उचलला जात नसल्याने अनेक नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारी आहेत. सद्य:स्थितीत शहरातील साफसफाई व कचरा उचलण्यासाठी ठेका देऊन काम करून घेतले जात आहे.