शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

प्रत्येक प्रसंगावर निघतोय पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:21 IST

जळगाव येथील साहित्यप्रेमी विशाखा देशमुख ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत पर्याय या शीर्षकांतर्गत ललित लेखात ‘मनमोकळं’ करताहेत...

आयुष्य नेहमीच एक संधी देत असतं़ सोप्या शब्दात त्याला ‘आज’ म्हणतात़ आज काय होणार हे नियतीच सांगू शकते़ आॅफिसमध्ये लवकर पोहोचायचे असते अशा वेळी नेमकी किल्ली हरविणे किंवा गाडीतले पेट्रोल संपणे, रिक्षाने जावे तर रिक्षा लवकर न मिळणे, कधी अनावधानाने पैसे विसरणे, तर कधी मोबाइल चोरीला जाणे, महिलांना तर ऐन गडबडीच्या वेळी सिलिंडर संपल्याने होणारी धावपळ अशा अनेक प्रसंगांना आपण सामोरे जातच असतो़पण काही वेळा तर असे प्रसंग उभे ठाकतात की पर्यायच सुचत नाही़ अशा वेळी योग्य निर्णय घेण्याचं भान असावं लागतं़ मध्यंतरी व्हॉट्सअ‍ॅपवर एक व्हिडीओ आला होता़ एक सद्गृहस्थ निर्मनुष्य असणाऱ्या रस्त्यावरून जात होते़ एकटाच कारमध्ये असल्याने छान झोकात मोठ्या पुलावरून शीळ वाजवत गाडी चालवत होता़ अचानक ध्यानीमनी नसताना गाडी पंक्चर होत़े वरती तळपतं उन तर खाली वाहणारी नदी.खाली उतरून टायर बदलण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून त्याने नटबोल्ट काढून जुने टायर काढले़ नवीन बदलणार तेवढ्यात हातातील नट खाली नदीत पडले़ ते अधिकच चिंताग्रस्त झाले़ पण कुठूनसा एक सामान्य माणूस येतो़ अशा वेळी परमेश्वर मदतीला येतो़ तसेच देवाच्या रूपात तो माणूस म्हणाला, ‘सर आता असं करा, बाकीच्या टायरचे १-१ नट काढून गाडी हळूहळू पुलावरून काढा़ थोड्या अंतरावर गॅरेज आहे़ तिथे गाडी चांगली करून घ्या़’ किती सहजतेने प्रश्न सुटला होता़ असाच काहीसा प्रसंग परवा घडला़ नुकताच गाण्याचा क्लास संपला होता़ राजश्रीने नेहमीप्रमाणे मला नमस्कार करून हातात सुंदरसा मोठ्या आकाराचा बॉक्स दिला आणि म्हणाली, ‘मॅडम, काल तुमचा वाढदिवस झाला म्हणून ही छोटी भेट. आताच बघा आणि सांगा आवडले का?’ त्यात असणारी साडी छानच होती़ पण तिच्याकडून घेणे योग्य वाटत नव्हते़ तिला सांगितलं़, ‘घेईन. पण तुझ्या लग्नात किंवा तुझ्या घरी येईन तेव्हा.’ ‘पण मॅडम घ्यानं़ माझ्या कमाईतून तुम्हाला आणि आईला घेतली आहे.’ अशाप्रसंगी कसं रिअ‍ॅक्ट व्हावं तेच कळत नव्हत़ं तिने इतक्या प्रेमाने दिली होती की, नकार देणंही चांगलं वाटत नव्हतं. काहीच पर्याय दिसत नव्हता़ तिला कोणत्या तरी प्रसंगी आपण ड्रेस घेऊन देऊ म्हणून मी ती ठेवून घेतली़ असे प्रसंग नेहमी घडत असतात. त्यातून काहीतरी पर्याय हा निघतच असतो.-विशाखा विलास देशमुख, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव