शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

विरोधी पक्षनेता म्हणूनच जास्त परिचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 20:30 IST

खडसे : विधानसभेत नसल्याची खंत

जळगाव : मंत्रीपदापेक्षा विरोधी पक्षनेता म्हणून केलेले काम लोकांच्या अधिक लक्षात आहे़ पाच वर्ष जनतेसाठी सातत्याने अभ्यासपूर्ण असे प्रश्न मांडल्याने त्याची पोच रविवारी विधानसभेत नेत्यांकडून मिळाली, असे मत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले़ विधानसभेत मी नसल्याची खंत आताच्या सत्ताधाऱ्यांना आहे, तशी ती मलाही असल्याचे ते म्हणाले़जळगावात त्यांच्या निवासस्थानी त्यांनी संवाद साधला मात्र, आता काही बोलण्याची वेळ नाही, असे सांगत त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळले़ मंत्री बाळसाहेब थोरात व जयंत पाटील यांनी रविवारी विधानसभेत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विरोधीपक्षात असताना केलेल्या कामगिरीचे कौतुक केले़ याबद्दल त्यांना विचारले असता, आपण पुराव्यानिशी अभ्यासपूर्ण अशी जी विरोधी पक्षनेता म्हणून छाप सोडली होती त्याची पावती दोघांकडून मिळाली़ देवेंद्र फडणवीस यांनी त्या पद्धतीने किंबहूना त्यापेक्षा सरस काम करावे, अशी अपेक्षा त्यांची असेल, असे खडसे म्हणाले़दरम्यान, एका लग्नपत्रिकेवर आधी माजी विरोधी पक्षनेता म्हणून उल्लेख आल्याने मंत्री म्हणून काय केले ते नाही पण विरोधीपक्षनेता होत, हे लोकांच्या अधिक लक्षात असल्याचा टोला त्यांनी लगावला़ आता नातू सांभाळत बसलो आहे, असेही ते म्हणाले. दाखविली़ विरोधी पक्षनेता हा अभ्यासू असावा जनतेच्या प्रश्नावर त्याने तडजोड करायला नको, असेही ते म्हणाले़ दरम्यान, आपण कुठलेही पक्षांतर करणार नाही, हे आधीच स्पष्ट केल्याचे सांगत त्यांनी पक्षांतरांच्या चर्चा फेटाळल्या़

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव