शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy Meeting Updates: खूशखबर! ईएमआयचा भार होणार कमी, सामान्यांना मोठा दिलासा, रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात
2
भाजपापाठोपाठ उद्धव ठाकरेंचाही शिंदेसेनेला दणका, तर राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर; २ दिवसात काय घडलं?
3
"अमेरिका गेम करतेय, तुमच्यासोबत अन् आमच्यासोबतही..."; एक फोन कॉल लीकनंतर युरोप अमेरिकेत खळबळ
4
'रोलेक्स'ला जगभरात इतकी मागणी का? ४-५ वर्षांचा वेटींग परियड? ९९% लोकांना कारण माहिती नसेल
5
Rupee Fall Reason Explained: रुपया घसरण्याचे नेमके कारण काय?
6
आणखी ३० टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतं सोनं; 'या' कारणामुळे येऊ शकते जोरदार तेजी, कोणी केली भविष्यवाणी?
7
असीम मुनीर आयुष्यभर वर्दीवरच राहतील, कधीच अटक होणार नाही; पाकिस्तान सैन्याचे सीडीएफ म्हणून नियुक्ती
8
इंडिगोची ५५० उड्डाणे रद्द, DGCA ची कारवाई; नियोजनात मोठी चूक, विमान कंपनीने माफी मागितली
9
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
10
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
11
Sonu Nigam Property Deal: सोनू निगमनं मुंबईत रेंटवर दिली प्रॉपर्टी, महिन्याचं भाडं पाहून अवाक् व्हाल; डिपॉझिट म्हणूनच मिळाले ९० लाख
12
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
13
"स्वत: काहीही साध्य केलं नाही, ते रोहित- विराटचं भविष्य ठरवतात" Harbhajan Singh भडकला!
14
रुपया रडविणार, खिसा रिकामा करणार! महागाईचा फटका सामान्यांना बसणार; निर्यातदारांना मात्र फायदा
15
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
16
जगभर: माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलीने दिला खासदारकीचा राजीनामा, रशिया-युक्रेन युद्धाशी कनेक्शन काय?
17
"भारत नशीबवान आहे की, त्यांना मोदींसारखा नेता मिळाला"- व्लादिमीर पुतिन
18
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा ६५ जागा लढण्यावर ठाम; शिंदेसेनेला १७ जागा देण्याची तयारी
19
अग्रलेख: नव्वदीचा रुपया काय म्हणतो? सरकारची झोप उडाली नसेल तर ती उडायला हवी
20
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असतानाही धरणगावात गुटख्याची खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 14:16 IST

राज्यात गुटखा बंदी झाली असली, तरी गेल्या कित्येक वर्षांपासून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे.

धरणगाव : राज्यात गुटखा बंदी झाली असली, तरी गेल्या कित्येक वर्षांपासून छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे. धरणगाव तालुक्यातही गुटख्याची अशा पद्धतीने सर्रास विक्री होत आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा पायदळी तुडवीत शहरातील प्रत्येक पानटपरींवर अवैधरीत्या गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूची राजरोसपणे सर्रास विकली जातेय.पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरात १०० हून छोट्या-मोठ्या पानटपऱ्या आहेत. या टपऱ्यांपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त टपऱ्यांमध्ये गुटाख्याची सर्रास विक्री होत आहे. अनेक पानटपरीचालक गुटख्याची पाकिटे लपवून ठेवून विक्री करतात, तर काही पानटपरी चालक उघडपणे गुटख्याची विक्री करताना दिसतात. अनेक टपरीचालकांचे चौकांतील पोलिस तसेच गस्तीवरील पोलिसांशी साटेलोटे असल्याने बिनदिक्कतपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे बोलले जात आहे.धक्कादायक म्हणजे यातील काही पान टपऱ्यांवर गुटख्यासोबत देशी दारूदेखील विकली जाते. काही ठिकाणी तर गांजादेखील विकला जातो. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. मध्य प्रदेशातून शहरात गुटखा दाखल होतो. गुटखा तस्करांकडून पानटपरींवर तो पोहचतो व शहरात प्रत्येक पानटपरींवर ह्यमागेल त्यांना गुटखाह्ण मिळत असतो.शाळेच्या परिसरात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक टपऱ्या, दुकानांत गुटख्याची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटख्याचे व्यसन वाढल्याचे मत सुज्ञ नागरिकांनी नोंदविले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला होता. पण तरीदेखील गुटखा मोठ्या प्रमाणात विकला जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतेय.शाळेच्या परिसरात अनेक पानटपऱ्यांवर गुटका सर्रास मिळत असल्याने विद्यार्थ्यांनाही तो खावासा वाटतो, परिणामी त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. एकीकडे आम्ही तंबाखूमुक्त शाळा करण्याकामी प्रयत्न करत आहोत तर दुसरीकडे सर्व गाव जर तंबाखू युक्त असेल तर व्यसन मुक्त अभियानाचा काहीही उपयोग होणार नाही. कोरोना काळ असूनही गुटका खाऊन थुंकणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. याचाही परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या परिसरात गुटका खाऊन थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहोत.-डॉ.संजीवकुमार सोनवणे, मुख्याध्यापक, पी.आर.हायस्कूल, धरणगाव

टॅग्स :Drugsअमली पदार्थDharangaonधरणगाव