शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

स्वत:च्या अपहरणाचा बनाव उघड

By admin | Updated: June 2, 2017 20:01 IST

आयपीएल क्रिकेट सट्टाबेटिंगमध्ये १० लाख रुपये हरणाऱ्या फैजपूर येथील तरुणाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव करीत १० लाखांची खंडणी मागत घरच्यांसह पोलिसांना

ऑनलाइन लोकमत

मुक्ताईनगर, दि. 02 -  आयपीएल क्रिकेट सट्टाबेटिंगमध्ये १० लाख रुपये हरणाऱ्या फैजपूर येथील तरुणाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव करीत १० लाखांची खंडणी मागत घरच्यांसह पोलिसांना चक्रात टाकणाऱ्या तरुणास पुणे येथून त्याच्या २ साथीदारांसह ताब्यात घेण्यात आले आहे.फैजपूर येथील रितेश अविनाश नेमाडे (वय २३) याने काही दिवसांपूर्वी अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथे छुप्या स्वरूपात अवैध सट्टा बेटिंगचा व्यवसाय सुरू केला होता. या निमित्ताने तो अंतुर्ली येथे यायचा. २४ मे पासून हा तरुण अचानक बेपत्ता झाला. त्यावेळेस त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला. मात्र, तो कोठेच सापडला नाही. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत तो हरवला असल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसाने त्याच्या नातेवाईकांना त्याचे हातपाय बांधलेले फोटो, त्याच्या अपहरणाचे फोन येवू लागले आणि दहा लाखांची मागणी होत होती. या संदर्भात त्याच्या नातेवाईकांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठत हा प्रकार पोलीस निरिक्षक अशोक कडलग यांना सांगितला.अगोदरच बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल्ल व त्याच्या भावाच्या शोधात हैराण असलेले पोलीस या नव्या अपहरण व खंडणी प्रकरणाने पुरतेच गोंधळले. पोलीस निरीक्षक कडलग यांनी ज्या मोबाईल क्रमांकावरून या तरुणाचे फोटो व व्हिडीओ कॉल येत होते त्याचा ५ दिवस तपास लावला. पुणे येथून हे व्हिडीओ कॉल होत असल्याची खात्री पटल्यानंतर तत्काळ उपअधीक्षक सुभाष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस पथक नेमले. त्यात पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे, कॉन्स्टेबल विनोद पाटील, हवालदार संतोष नागरे, संजय भोसले, जावळे यांनी पुणे गाठत रितेश याचे दोन मित्र प्रकाश गणेश महाजन व देवानंद कैलास पाटील यांना मोबाईल नंबरच्या आधारावर गाठले. दोघांना खाक्या दाखवताच त्यांनी रितेशचा पत्ता सांगितला. त्यातून पुण्यातील क्रिकेटवाडीत छापा टाकला असता तेथे स्वत: च्या अपहरणाचा बनाव करणारा व लपून असलेला रितेश मित्राच्या खोलीवर मिळून आला. येतूनच मित्राकरवी हातपाय बांधलेले फोटो व खंडणीची रकमेची मागणी करीत असल्याचा प्रकार पोलिसी खाक्या दाखवताच उघड झाला.पोलीस तपासात त्याने मागील महिन्यात आयपीएल क्रिकेट सामने सुरू होते. या सामन्यात त्याने सट्टा खेळला व या बेटिंग़मध्ये दहा लाख रुपये हरल्यामुळे पैशांसाठी घरच्यांना त्रास देण्याच्या हेतूने, असा प्रकार केल्याचे कबूल केले. तसेच,  स्वत: च्याच अपहरणाचा बनाव करणारा या रितेश नेमाडे़ला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याचे दोन मित्रदेखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. घरच्यांसह नातेवाईकांना अपहरणाबाबत कॉल करताना थेट व्हाईस कॉलऐवजी इंटरनेटचा वापर करीत व्हिडीओ कॉल व मेसेंजरचा वापर करीत बनवा-बनवी करण्यात आली. त्यामुळे घरच्या मोबाईलवर नंबर दुसराच यायचा व नंबर मात्र तिसऱ्याच मोबाईलने होत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.