शहरं
Join us  
Trending Stories
1
सोशल मीडियावरचे आरोप गडकरींनी लोकसभेत फेटाळले; म्हणाले, इथेनॉल मिश्रित इंधनावर ARAI ने १ लाख किमी...
2
बांगलादेशात युनूस सरकार मावळणार, संध्याकाळी मोठी घोषणा होणार; संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं
3
महाराष्ट्रातील सीमेवरील गावात गुजरातची घुसखोरी; सीमांकन हळूहळू वाढवत असल्याचा स्थानिकांचा दावा
4
'त्यांचे हाथ थरथरत होते, दडपणाखाली होते'; राहुल गांधी अमित शाहांच्या लोकसभेतील भाषणावर आता काय बोलले?
5
लग्नाआधीच मुलगी गरोदर; आईला कळताच तिच्या प्रियकराला घरी बोलवलं अन् मग...शेवट भयंकर!
6
आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
7
'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक
8
व्हॉट्सअ‍ॅपवरची एक चूक थेट घेऊन जाऊ शकते तुरुंगात! 'ही' गोष्ट करताना किमान दहा वेळ विचार कराच
9
पाकिस्तानमध्ये कधी येणार? 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल'मध्ये आलिया भटला चाहत्याचा प्रश्न; म्हणाली...
10
ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन, म्हणाला- "माझ्या पत्नीला..."
11
धक्कादायक! दारुच्या नशेत होता बोगस डॉक्टर; YouTube पाहून ऑपरेशन, चुकीची नस कापली अन्...
12
Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत
13
पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
14
लुथरा बंधूंचे थायलंडमधून फोटो आले, पासपोर्टसह घेतले ताब्यात; कारवाईपासून वाचण्यासाठी पळाले खरे पण...
15
व्हॉट्सअप चॅट्स वाचण्यासाठी...! डीएसपी 'कल्पना वर्मा' यांच्या 'लव्ह ट्रॅप' प्रकरणात 'Love U यार...' ची एन्ट्री...
16
Geminid Meteor Shower: १३,१४ डिसेंबर ठरणार इच्छापूर्तीची रात्र; आकाशाकडे बघून करा 'हे' काम!
17
'एसी-थ्री टियर'मध्ये प्रवाशासोबत कुत्रा! रेल्वेतून नेता येतो का? व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे 'सेवा' झाली सक्रिय
18
माइंडमेश समिट २०२५: विद्या-कला-नीती पुरस्कारांची घोषणा; समाजाला आकार देणाऱ्यांचा सन्मान
19
३ महिन्यांतच गमावलेलं दुसरं बाळ, पहिल्यांदाच व्यक्त झाली सुनीता अहुजा, म्हणाली- "तिला श्वास घ्यायला त्रास व्हायचा..."
Daily Top 2Weekly Top 5

फक्त शेगडी मिळाली; मोबाईल चार्जिंगसाठी लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 21:55 IST

सातपुड्यातील आदिवासींचा संघर्ष अजूनही रोजच्या जगण्याशी; निवडणुकीचे सोयरसूतक नाही

मिलिंद कुलकर्णीकाठी (जि.नंदुरबार) : शेगडी मिळाली, अजून हंडीची वाट पाहतोय, अर्धा दिवस वीज नसते, त्यामुळे टी.व्ही.तर सोडा जगाशी संपर्क साधणाऱ्या मोबाईलच्या चार्जिंगसाठी मोठ्या गावात जाऊन दहा रुपये मोजावे लागतात...हे चित्र आहे सातपुडा डोंगरातील आदिवासी पाड्यांमधील. लोकसभा निवडणुका, केंद्र सरकारच्या घोषणा, विरोधी पक्षांचे आरोप, स्थानिक उमेदवार याविषयी काहीही देणेघेणे नसल्याची स्थिती नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार जयवंतराव नटावदकर यांचे पूत्र डॉ.सुहास नटावदकर यांनी केलेली बंडखोरी, ९ वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेल्या माणिकराव गावीत यांच्याऐवजी काँग्रेसने आमदार अ‍ॅड.के.सी.पाडवी यांना दिलेली उमेदवारी, भाजपच्या डॉ.हीना गावीत या दुसऱ्यांदा अजमावत असलेले नशिब याविषयी माध्यमांमध्ये चर्चा असली तरी सातपुड्याच्या दुर्गम भागात निवडणुकीचे काहीही वातावरण नाही. वडफळ्या, मोलगी, विसरवाडी, खांडबारा अशा मोठ्या गावांमध्ये थोडी फार चर्चा दिसून येते, पण पिंपळखुटा, काठी, खर्डा, मुंदलवड, हरणखुरी याठिकाणी निवडणुकीचा विषयही चर्चेत आला नाही.दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे उन्हाळ्यातील प्राधान्यक्रम वेगळेच आहेत. भोंगºया बाजार, होळी आणि मेलदा उत्सव गेल्याच महिन्यात आटोपले. या उत्सवाच्या निमित्ताने मध्य प्रदेश, गुजराथमध्ये मजुरीसाठी स्थलांतर केलेले महिला-पुरुष परतले आहेत. परतल्यावर पहिल्यांदा भेडसावतोय तो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी प्रकल्प राबविलेल्या मोजक्या गावांमध्ये पाण्यासह काही सुविधा झाल्या आहेत, पण शासकीय सुविधा नावालाच आहेत. कुठेतरी हायमास्ट लॅम्पचा पोल दिसतो, तर एखाद्या गावात हातपंप दिसतो. उज्ज्वला योजनेची शेगडी मिळाली, पण गॅस हंडी अद्याप मिळाली नसल्याची काही गावांमध्ये स्थिती आहे. पारंपरिक उर्जा पोहोचू शकत नसल्याने वनविभागाने काही गावांमध्ये सौर दिवे आणि प्लेट दिल्या आहेत.काठी गावातील संस्थानिकांची होळी प्रसिध्द आहे. देशविदेशातील नागरिक ती बघायला आवर्जून येतात. होळीचे मैदान पेव्हर ब्लॉक बसवून चकचकीत केले आहे. पण अर्ध्या दिवसापेक्षा अधिक काळ वीजपुरवठा नसतो. मोबाईल चार्जिंगसाठी मोलगी या मोठ्या गावात जाऊन दुकानदाराला १० रुपये द्यावे लागतात. इन्व्हर्टरच्या मदतीने एकावेळी ५-६ मोबाईल चार्र्जींग केले जातात. हा नवीन व्यवसाय याठिकाणी सुरु झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या शहरी भागात टपºया,दुकानांवर मिळतात, तसे येथील गावांमध्ये त्याच बाटल्यांमध्ये पेट्रोल विकायला ठेवलेले असते. मोटारसायकल हे सर्वाधिक वापरले जाणारे वाहन असल्याने पेट्रोल हे अत्यावश्यक झालेले आहे. जगाशी संपर्क साधायचा असेल तर रेंज मिळत नसल्याने डोंगरावर जावे लागते. रेंज स्पॉट तयार झाले असून तेथे जाण्यासाठी पायवाट तयार झाली आहे.महू आणि आमचूरचा व्यवसाय आता सुरु होईल, त्यासोबतच खरीप हंगामाची तयारी करण्यात आदिवासी लोक व्यग्र आहेत.पंच, सरपंच हे सांगतील, त्याला मतदान केले जाईल, असा सूर पाड्यांमधील आदिवासी बांधवांमधून उमटला. निवडणुकीचा शहरातील धुराळा दुर्गम भागात पोहोचलाच नसल्याचे चित्र आढळून आले.कार्यकर्ते संभ्रमितनंदुरबार जिल्ह्याची सत्ता गावीत, नाईक, पाडवी अशा मोजक्या ८-१० कुटुंबामध्ये विभागलेली आहे. ग्रामपंचायतीपासून तर खासदारकीपर्यंत याच कुटुंबामधील सदस्य पदावर असतो. शिक्षणामुळे जागरुकता आलेल्या युवकांमध्ये आता असंतोष, संभ्रम अशा संमिश्र भावना दिसून येतात. काही संघटना म्हणूनच निवडणूक मैदानात उतरल्या आहेत. मात्र त्यांचा प्रभाव अल्प आहे.

टॅग्स :Politicsराजकारण