शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
5
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
6
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
7
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
8
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
9
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
10
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
11
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
12
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
13
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
14
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
15
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
16
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
17
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
18
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
19
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
20
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती

अस्वस्थ, हिंसक वातावरणावर लेखकच उत्तर शोधतील - भालचंद्र नेमाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:06 IST

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे साहित्य आणि कला पुरस्कारांचे वितरण

जळगाव : राज्यात वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे मुली, स्त्रीयांना वाईट दिवस आले आहेत. एवढे समाजशास्त्रज्ञ असूनदेखील यावर उपाय कसा सापडत नाही, असा रोखठोक प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला. देशात, राज्यात जाती-धर्माच्या नावावर वाढणारी अस्वस्थता, महिलांवरील अत्याचार, वाढती स्त्री भ्रूण हत्या या सारख्या हिंसक वातावरणावर केवळ लेखकच उत्तर शोधू शकतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या स्मृतिदिनी जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्य आणि कला पुरस्कारांचे वितरण मंगळवारी सायंकाळी जैन हिल्सवरील कस्तुरबा सभागृहात झाले, त्या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. नेमाडे बोलत होते.या वेळी डॉ. नेमाडे यांच्यासह उद्््घाटक म्हणून कविवर्य ना.धों. महानोर, प्रमुख अतिथी म्हणून संघपती दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, पुरस्कार्थी शिल्पकार राम सुतार, मेघना पेठे, अजय कांडर, रफिक सूरज उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन आनंद गुप्ते यांनी पुरस्कारांची भूमिका सांगितली. कवीवर्य महानोर यांच्याहस्ते लडाख येथील खास वाद्याचे वादन करून सोहळ््याचे उद््घाटन झाले. सोहळ््यामध्ये चारही पुरस्कार विजेत्यांचे कार्य परिचयात्मक डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली....हा तर लाज वाटणारा प्रकारछत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात मराठा बाणा निर्माण करणाºया मलिक अंबर ज्या धर्माचा होता त्याच मुस्लीम धर्मीय बांधवांना देशात अस्वस्थ वाटणे म्हणजे आपल्याला लाज वाटण्यासारखा प्रकार आहे, असे परखड मत डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी सध्याच्या परिस्थितीवर व्यक्त केले.महिलांना वाईट दिवसवाढत्या अत्याचारांच्या घटनामुळे सध्या मुली, महिलांना वाईट दिवस आले आहे, अशा शब्दात डॉ. नेमाडे यांनी अत्याचाराच्या घटनांबद्दल नाराजी व्यक्त केली. अत्याचार वाढत असले तरी एवढे समाजशास्त्रज्ञ असूनही उपाय सापडत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. रोज बातम्या पाहिल्या तर अत्याचार, महिलांना जाळले, असेच वाचायला मिळते. त्यामुळे पुरुष म्हणून लाज वाटायला हवी.शीलावर अतिक्रमण झाल्यास मारुन टाकावेस्त्रीयांच्या वाढत्या अत्याचाराच्या घटना पाहता डॉ. नेमाडे म्हणाले की, कायदाच असा हवा की, स्त्रीयांच्या शीलावर अतिक्रमण होत असेल तर तिने संबंधितांना मारुन टाकावे. त्यामुळे अशा घटनांना आळा बसू शकेल.सुशिक्षितांमध्ये वाढतेय स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाणपूर्वी घरात महिलांची संख्या अधिक असायची. आम्हीदेखील महिलांसोबत वाढलो. मात्र आज स्त्रीयांचीच संख्या कमी झाली आहे. सुशिक्षित, श्रीमंतांमध्ये स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत असून हा प्रकार कधी आदिवासी बांधवांमध्ये सापडणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त डॉ. नेमाडे यांनी व्यक्त करीत निर्लज्जपणाचे लक्षण दिवसेंदिवस वाढत असल्याचे ते म्हणाले. महिलांवरील अत्याचाराचे मूळ म्हणजे मुलींची कमी होणारी संख्या असून कायदा सुव्यवस्थेसह पोलीस, सैन्य दलातील महिलांना अग्रक्रमाने स्थान दिले पाहिजे, असेही डॉ. नेमाडे यांनी सुचविले.सर्व पुरस्कार विजेते यांचे साहित्य व कलेविषयी कार्य हे राष्ट्र, धर्म, जात, लिंग यापलीकडचा विचार करणारे आहे. सर्व पुरस्कारार्थी आप-आपल्या क्षेत्रात दिग्गज आहेत, अशा व्यक्तींचा सत्कार ही चांगली बाब असे सांगत पुरस्कार्थी साहित्यिकांचे डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी कौतूक केले.पुरस्कार विजेतेभवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे पहिला व्दिवार्षिक ‘कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार’ जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार (गोंदूर, धुळे) यांना देण्यात आला. दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथसंपदा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.श्रेष्ठ लेखिका म्हणून बहिणाई पुरस्कारासाठी मेघना पेठे (बाणेर-पुणे), श्रेष्ठ कवी म्हणून बालकवी ठोमरे पुरस्कारासाठी अजय कांडर (कणकवली, जि.सिंधुदुर्ग) तर श्रेष्ठ गद्यलेखक म्हणून ना. धों. महानोर पुरस्कारासाठी रफिक सूरज (हुपरी, जि. कोल्हापूर) यांना वितरीत करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि ग्रंथसंपदा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्व पुरस्कार डॉ. भालचंद्र्र नेमाडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.भवरलाल जैन यांनी मोठ्या कल्पकतेने साहित्यांची बळकटी येण्यासाठी, भाषेला समृद्ध करण्यासाठी पुरस्कार सुरू केले. साहित्याखेरीज विविध क्षेत्रांचे कार्य अधोरेखित करून २५च्या वर पुरस्कार दिले जातात, हे प्रकार खूप दुर्मिळ आहे, असे गौरोद्गार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी जैन समुहाकडून दिल्या जाणाºया पुरस्कारांबद्दल काढले.कलाकाराने वृक्षाप्रमाणे काम करीत रहावे - शिल्पकार राम सुतारपुरस्कार हे प्रत्येक कलाकाराला स्फूर्ती देणारे असतात. पुरस्कारासाठी मी कधी काम केले नाही. प्रत्येकाने काम करताना पुरस्कार मिळावे ही आस ठेवू नये. फक्त सकारात्मकरित्या चांगल्यातील चांगले निर्माण करीत राहणे हेच कलाकारांचे ध्येय असावे. कोणताही वृक्ष अपेक्षा न ठेवता फुल देत असतो त्या साठी वृक्षांची प्रेरणा घेऊन त्यांच्या प्रमाणे कार्य करीत राहणे हाच उद्देश कलाकाराचा असावा, असा सल्ला जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी दिला.बहिणाईंच्या नावासारखा निर्मळ पुरस्कार नाही - मेघना पेठेबहिणाई या अलौकीक होत्या. त्यांचे साहित्य जगाला दिशा देणारे होते. त्यांच्या नावाने दिला जाणारा यासारखा निर्मळ पुरस्कार कोणता नाही, असे मत मेघना पेठे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या की, पर्यावरणाची दृष्टी असलेल्या वातावरणात जैन परिवाराने जपलेला निसर्गाच्या सान्निध्यातील कृतज्ञतापूर्वक सोहळ्यात हा पुस्कार दिल्याने आनंद आहेच. पुरस्काराकडे पाहत जीवनात व्यक्त होताना भावनांच्या आदरातून लेखन होते, तोच पुरस्कार महत्त्वाचा वाटतो असेहीे त्या म्हणाल्या.पुरस्काराने संवादाची जागा शोधण्यास मदत - अजय कांडरआधुनिक काळाशी जुळवून घेताना आपले मूळ शोधले पाहिजे. सध्या माणूस माणसाकडे जाण्याची प्रक्रिया कुठेतरी मंदावली आहे. यातील संवेदनशीलता जपण्याची संवादाची जागा शोधण्याची प्रेरणा म्हणजे हा पुरस्कार आहे. राजकारण्यांचा चेहरा काळवंडला जातो तेव्हा सांस्कृतिक चेहरा उजळवावा लागतो ते काम भवरलाल जैन व अशोक जैन यांनी केले आहे, असे सत्काराला उत्तर देताना अजय कांडर म्हणाले.सर्जनशील लेखनाला बळ देणारा पुरस्कार - रफिक सुरजजगण्याच्या पलिकडे जे घेऊन जाते ते म्हणजे साहित्य असे सांगत पर्यावरण गुदमरून टाकणाºया वातावरणातून माझ्या साहित्याची निर्मिती झाली, असे रफिक सुरज म्हणाले. सध्या समाजात सामाजिक आरोग्य बिघडले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हा पुरस्कार मला नेहमीच चांगल्या लेखणासाठी प्रेरणा देत राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव