शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बोदवड शहरात वर्षभरात केवळ १८ दिवस पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 17:59 IST

बोदवड येथे ओडीए योजनेचा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर पाणी पुरवठा समस्या झाली गंभीर

ठळक मुद्देओडीए पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर पाणी समस्या बिकटजुन्या पाईपलाईनमधून जंतुमिश्रीत पाणीपुरवठानगरपालिकेकडून सक्तीने करवसुली

गोपाल व्यास/ आॅनलाईन लोकमतबोदवड,दि.२४ : बोदवड ग्रा.पं.ची नगरपंचायत झालेल्या बोदवड शहराला वर्षभरात केवळ १८ दिवसच पाणी मिळाल्याची विदारक स्थिती आहे. ओडीए पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडीत केल्यानंतर येथील पाणी समस्या बिकट झाली आहे.गावाचा तालुका झालेले हे शहर मुलभूत सुविधांपासून कोसोदूर आहे. ग्रामपंचायतीच्या कालावधीत शहरवासीयांना महिन्यातून किमान तीन दिवस तरी पाणी मिळत होते. शिवाय घर आणि पाणीपट्टी कमी होती आणि सक्तीची वसुलीदेखील होत नव्हती.६ मे २०१६ मध्ये बोदवड ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि नगरपंचायत अस्तित्वात आली. त्यानंतर शहरवासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या. आता विकास होणार. वेळेवर मुलभूत सुविधांसह पाणी मिळणार या आशेने शहरवासीय आनंदीत होते. परंतु त्यांच्या आशेवर वर्षभरात पाणी फिरले. नगरपंचायतीने सक्त वसुली हाती घेतली. थकबाकीदारांच्या दुकानांना सील ठोकण्यात आले. शहरात मोठे फलक लावून थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. बदनामीपोटी काहींनी तत्काळ पाणी व घरपट्टी भरली. त्या मोबदल्यात नगरपंचायतीने काय दिले? पंधरा दिवस ते २० दिवसाआड पाणी वर्षभरात केवळ १८ दिवस पूर्ण वर्षात फक्त ३६ तास पाणी तेही रात्रीबेरात्री अशी स्थिती बोदवड शहराची झाली आहे.गत महिन्यातच पाणीपुरवठा सभापतींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे क्लोरीनसाठी मीठ उपलब्ध करून देण्यासाठी लेखी पत्र ही पाठवले होते. परंतु काहीही हालचाल झाली नसल्याची स्थिती आहे. यामुळे जुन्या जिर्ण पाईपलाईनमधून जंतुमय पाणीपुरवठा होत आहे.

टॅग्स :WaterपाणीBodwadबोदवड