शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये फक्त १३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 12:27 IST

तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १४.७४ टक्के साठा, ८ मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाट

जळगाव: जिल्ह्यात यंदा गत १५ वर्षातील गंभीर दुष्काळ असून अल्प पावसामुळे धरणांमध्ये देखील कमीच पाणीसाठा झाला होता. त्यामुळे एप्रिल संपत आला असताना जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये एकूण १२.६७ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये १४.७४ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पांमध्ये मागील वर्षी आजच्या तारखेला २४.९६टक्के पाणीसाठा होता.गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५ टक्के कमीच म्हणजे सुमारे ६८ टक्के पाऊस झाला. त्यातही पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड दिला. वाहून निघेल असा पाऊस फारच कमी प्रमाणात झाल्याने धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा होऊ शकला नाही.८ मध्यम प्रकल्पांमध्ये ठणठणाटजिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी ान्याड, बोरी, भोकरबारी, अग्नावती, तोंडापूर, हिवरा, बहुळा या ८ प्रकल्पांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा आहे. तर उर्वरीत सुकी, अभोरा, मंगरूळ, मोर व गूळ या पाच मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण १०.२० टक्के पाणीसाठा आहे.मोठ्या प्रकल्पांमध्येही मोजकाच साठा१०० टक्के भरूनही हतनूरमध्ये सध्या ३.६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. गतवर्षी आजच्या तारखेला या धरणात २०.०४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.गिरणा धरणात मात्र गतवर्षीच्या तुलनेत थोडा अधिक साठा यंदा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी गिरणात १७.२७ टक्के पाणीसाठा होता. सध्या गिरणात १८.२६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.जळगाव शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणाची स्थिती मात्र बिकट आहे. धरणात सध्या १८.६७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी ४६.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.लघुप्रकल्प कोरडेचजिल्ह्यातील ९६ लघुप्रकल्पांपैकी बहुतांश प्रकल्प कोरडेच असून सर्व प्रकल्प मिळून जेमतेम ४.४० टक्के पाणीसाठा आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव