शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

हरभरा नोंदणीच्या मुहूर्ताला ‘आॅनलाईन’ सातबारा उताऱ्याचा ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 19:23 IST

केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत सुरू होणाºया हरभरा खरेदीसाठी राज्य सरकारने अशा खरेदी केंद्रावर नाव नोंदणीसाठी हस्तलिखित नव्हे तर आॅनलाईन सातबारा उतारा सक्तीचा केला आहे. दुसरीकडे मात्र यासाठी लागणारे डीएससी मशीनच जिल्हाभरातील तलाठ्यांनी दोन दिवसांपूर्र्वी तहसील कार्यालयात जमा केल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे.

ठळक मुद्देतलाठ्यांची डीएससी मशीन वापसी अर्ध्या-एक तासाने निघतो एक दाखला अन् विलंबाने होतात नोंदीशेतकऱ्यांचा रोष होतोय ‘अप्पां’वरही

खेडगाव, ता.भडगाव, जि.जळगाव : केंद्र सरकारच्या आधारभूत किमतीत सुरू होणाºया हरभरा खरेदीसाठी राज्य सरकारने अशा खरेदी केंद्रावर नाव नोंदणीसाठी हस्तलिखित नव्हे तर आॅनलाईन सातबारा उतारा सक्तीचा केला (तसा जी.आर.च असल्याचे सांगितले जाते.) आहे. दुसरीकडे मात्र यासाठी लागणारे डीएससी मशीनच जिल्हाभरातील तलाठ्यांनी दोन दिवसांपूर्र्वी तहसील कार्यालयात जमा केल्याने शेतकरी कात्रीत सापडला आहे. अगोदरच एक महिना उशिराने हरभरा खरेदी प्रक्रिया शासनाने सुरू केली असून, त्यात आता आॅनलाईन सातबारा उताºयावाचून शेतकऱ्यांचे काम अडले आहे. पुन्हा नोंदणी, प्रत्यक्ष हरभरा मोजणी व शेतकºयांना पैसे मिळण्यात विलंब होणार आहे. तेदेखील ऐन दुष्काळात मोठ्या कष्टाने हरभरा काढूनही हे भोग शेतकºयांच्या वाट्याला आले आहेत.आॅनलाईनचा फज्जादोनच दिवसांपूर्वी तालुक्यावरील खरेदी-विक्री संघाकडे अशी हरभरा खरेदी प्रक्रिया म्हणून उत्पादक शेतकºयांची नावनोंदणी सुरू झाली. मात्र त्यासाठी बात्सर व खेडगाव येथील शेतकºयांनी तलाठ्याकडे सात-बारा उतारा मागणी केली. तेव्हा यासाठी लागणारे डीसीएस हे उपकरण तहसील कार्यालयाकडे जमा केल्याचे सांगण्यात आले व यातील काही शेतकºयांनी आधीच काढून ठेवलेल्या आॅनलाईन सातबारा उताºयावर तलाठ्यांनी हस्ताक्षराने पीकपेºयात हरभरा नोंद केली. मात्र पाचोरा येथील हरभरा खरेदी केंद्रावर हे सातबारा स्वीकारले नाहीत. त्यामुळे नोंदणी न करता शेतकºयांना परत यावे लागले. सेतू सुविधा केंद्राकडून सातबारा उतारा काढला तरी त्यावर रब्बीचा पीकपेरा नसल्याने तो तलाठी यांच्याकडूनच लावून घ्यावा लागणार असल्याने पुन्हा तो आॅनलाईन नसल्याने उतारा हरभरा खरेदीच्या नाव नोंदणीसाठी ग्राह्य धरीत नसल्याने खरी अडचण आहे. निदान आॅनलाईनचा असा घोळ सुरू असताना प्रशासनाने असे हस्तलिखित सातबारे उतारे खरेदी केंद्रांना स्वीकारण्याच्या सूचना, आदेश करावेत, अशी शेतकºयांची मागणी आहे.प्रांताधिकाºयांचाही प्रतिसाद नाहीकाही शेतकºयांनी योगायोगाने भडगाव येथे आलेल्या प्रांताधिकारी कचरे यांच्याकडे ही व्यथा मांडली. तेव्हा त्यांनी पाहू, मार्ग काढू अशी असमर्थता दाखविली तर एका महसूल अधिकाºयाने हरभरा खरेदी केंद्रावर काय विकता? बाहेर मार्केटला विका, असा फुकटाचा सल्ला दिला.काय आहे तलाठी अप्पांचे आॅनलाईन दुखणे?यासंदर्भात भडगाव महसुलातील एका तलाठ्याने सांगितले की, जिल्हाभरातील तलाठ्यांंनी आपले डीएससी हे आॅनलाईन कामासाठी लागणारे उपकरण त्या-त्या तहसीलमध्ये जमा केले आहे. यामागील कारण म्हणजे सर्व्हर स्लो चालत असल्याने एका-एका शेतकºयाला आॅनलाईन सातबारा उतारा द्यावयाचा म्हणजे अर्धा-एक तासाचा अवधी लागतो. तीच अडचण शेतीसाठीच्या विविध नोंदी करताना येत असल्याने संबंधित शेतकºयांचा रोष तलाठ्यांवर होतो म्हणूनच सोमवारपासून आॅनलाईन कामासाठी आवश्यक डीएससी (डीजीटल सिस्टीम कंट्रोल) हे लॅपटॉपला जोडण्यात येणारे उपकरणच तहसीलकडे जमा केले आहे. एकप्रकारे आॅनलाईनच्या वेळकाढूपणाला कंटाळून त्यांनी असहकार पुकारला आहे. जोपावेतो सर्व्हरवर काम जलद होत नाही तोवर अॉनलाइन काम बंद राहणार असल्याचे कळते.

टॅग्स :FarmerशेतकरीBhadgaon भडगाव