आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२१: आजारपणाला कंटाळून सुखदेव भावजी सोनवणे (वय ४५ रा.कानळदा, ता.जळगाव) यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली.याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुखदेव सोनवणे हे एका पायाने अपंग होते. सतत आजारी राहत असल्याने त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा अशी शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. गावात दिलेली मुलगी त्यांना चहा बनविण्यासाठी घरी आली असता तेव्हा सोनवणे यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. नातेवाईकांच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत. एक मुलगी गावातच तर दुसरी मुलगी नाशिक येथे राहते.
आजारपणाला कंटाळून जळगाव जिल्ह्यात एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 21:41 IST
आजारपणाला कंटाळून सुखदेव भावजी सोनवणे (वय ४५ रा.कानळदा, ता.जळगाव) यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली.याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आजारपणाला कंटाळून जळगाव जिल्ह्यात एकाची आत्महत्या
ठळक मुद्दे कानळदा गावात घडली घटनामुलगी चहा बनविण्यासाठी आली असता उघड झाली घटनाजिल्हा रुग्णालयात केले मृत घोषीत