भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील खेडगाव येथील शांताराम झगा निकम या ५० वर्षीय प्रौढाने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १३ रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी खेडगाव शिवारात घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.पोलीस सूत्रांनुसार, शांताराम झगा निकम (वय ५०, रा. खेडगाव, ता.भडगाव) हे १३ रोजी सकाळी ८ वाजता घरुन शेतात जातो, असे सांगून गेले आणि खेडगाव शिवारातील पुरुषोत्तम महाजन यांच्या शेतातील आंब्याच्या झाडास दोरीने गळफास घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र मयताने आत्महत्या का केली, मृत्यूचे कारण समजू शकले नाही.याबाबतची माहिती मयताचे मेहुणे अभिमन दशरथ सोनवणे यांनी भडगाव पोलिसांना दिली. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस नाईक नितीन सोनवणे करीत आहेत. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे एकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:46 IST
भडगाव तालुक्यातील खेडगाव येथील शांताराम झगा निकम या ५० वर्षीय प्रौढाने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे एकाची आत्महत्या
ठळक मुद्देशेतात आंब्याच्या झाडाला घेतला गळफासआत्महत्येचे कारण अज्ञातसकाळी घरुन शेतात गेले अन् घेतला गळफास