शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जगदंबेच्या दरबारात दरवळला एक लाख किलो धूपचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:20 IST

नवरात्रोत्सव : पावडर, कोन धूपसह आता कप धूपचीही चलती

जळगाव : नवरात्रोत्सवात देवीला गुगूळ व इतर होमहवनच्या सामग्रीचा वापर करून पूजा करण्याची प्रथा असताना त्यात धूपचाही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यानुसार यंदा नवरात्रोत्सवात शहरात एक लाख किलो धूपची विक्री होऊन दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली.गणेशोत्सवापासून अगरबत्ती, धूप यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. त्यात नवरात्रोत्सवात देवीच्या स्थापना होणाऱ्या मंडळासह घरोघरी होमहवन होते. सोबतच दररोज धूप लावून देवीची आराधना केली जाते. यंदा नवरात्रोत्सात मोठ्या प्रमाणात पूजा साहित्याची विक्री झाली. त्यात दुर्गाष्टमीला तर अनेकांकडे फुलोरा, होमहवनसाठी सर्वच पूजा साहित्याची सर्वाधिक विक्री होते. त्यानुसार यंदाही रविवारी असलेल्या दुर्गाष्टमीसाठी शनिवारीच मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.त्यात यंदाच्या नवरात्रोत्सवातील केवळ धूपच्या उलाढालीचा आढावा घेतला तर तब्बल एक लाख किलो धूप या उत्सवासाठी विक्री झाले. १० ते १०० रुपये प्रती नग या प्रमाणे विक्री झालेल्या धूपच्या माध्यमातून तब्बल दोन कोटी रुपयांचे धूप विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.कप धूपबाजारात पावडर धूप, कोन धूप असे प्रकार पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. त्यात आता कप धूपची भर पडली असून या प्रकारच्या धूपला जास्त मागणी वाढली आहे. या धूपचे वैशिष्ट म्हणजे कप अथवा वाटीच्या आकारातील धूपमध्ये होमहवनची सामग्री असते. धूपच्या एका कोपºयावर हे धूप पेटविले की ते गोलाकार आकारात पेटत जावून त्यातील सामग्रीही पेटते. त्यामुळे सर्वत्र धूपदानीची अनुभुती येते. बाजारात लोभान, गुगूळ, हवन, उद तसेच लोभान व उद एकत्रित असे या कप धूपचे विविध प्रकार विक्रीला आहे.४एरव्ही नेहमीदेखील लोभान लावल्याने भूत पिशाच्च होेत नाही, अशी अनेकांची श्रद्धा असल्याने लोभान धूपची या कारणामुळेही खरेदी होत आहे. तसेच धूप लावल्याने डासचाही त्रास होत नसल्याने अनेक जण श्रद्धेसोबतच यासाठीही धूपला पसंती देतात. मात्र नेहमीपेक्षा नवरात्रात तर धूपला अधिकच मागणी वाढल्याने यात मोठी उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव