शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणी एकाला जन्मठेप तर तिघांना दोन वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:41 IST

कैलास सोनवणे रेकॉर्डला फरार

जळगाव : चौघुले प्लॉट भागातील किशोर मोतीलाल चौधरी (३२) खून प्रकरणात न्यायालयाने सुरेश दत्तात्रय सोनवणे (४४) याला न्यायालयाने जन्मठेप तर उमेश धनराज कांडेलकर (३२), रत्नाबाई सुरेश सोनवणे (३९) व वैशाली उमेश कांडेलकर (२९) सर्व रा.प्रजापत नगर, जळगाव यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.दरम्यान, या प्रकरणातील अन्य दहा जणांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. कैलास सोनवणे यांचे दोषारोपपत्रात नाव आहे, मात्र आरोपी म्हणून नाव नाही, त्यात त्यांना पोलिसांनीच फरार दाखविले आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांनी शनिवारी हा निकाल दिला.काय होती घटनागणेश विश्वास सपकाळे याच्याविरुध्द दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात सागर चौधरी फिर्यादी आहे. या गुन्ह्यात त्याने गणेश सपकाळे याला मदत करावी, कोर्टात विरोधात साक्ष दिली आहे असे म्हणत सुरेश दत्तात्रय सोनवणे, उमेश धनराज कांडेलकर या दोघांनी बर्फ फोडण्याच्या टोच्याने व इतरांनी किशोर चौधरी याच्यावर हल्ला केला होता तर भांडण सोडविण्यासाठी आलेले मोतीलाल भावलाल चौधरी, योगीता किशोर चौधरी, जयश्री सागर चौधरी, सुभद्राबाई मोतीलाल चौधरी व नीलेश पंडीत चौधरी यांना इतर १० ते १५ जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद मोतीलाल चौधरी यांनी दिली होती. दरम्यान, उपचार सुरु असताना किशोर चौधरी याचा मृत्यू झाला होता. तपासाधिकारी तत्कालिन पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.पोलिसांवर ओढले ताशेरेन्यायालयाने निकाल देताना पोलिसांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.सीसीटीव्ही फुटेज ठरले आधारया खटल्यात न्यायालयाने सीसीटीव्हीचा बारकाईने अभ्यास केला. त्यात प्रत्यक्ष घटनास्थळी चार जण दिसून येत आहेत. मुख्य आरोपी सुरेश सोनवणे याच्याजवळ बर्फ फोडण्याचा टोचा दिसत नसला तरी तो कमरेत किंवा खिशात ठेवला असू शकतो, असे मत नोंदविले. त्याशिवाय न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेने (सी.ए.) दिलेल्या अहवालात जप्त केलेल्या टोचाला मानवी रक्त लागलेले असल्याचे म्हटले आहे. या खटल्यात सरकारपक्षातर्फे १४ तर बचावासाठी ४ असे १८ साक्षीदार तपासण्यात आले आहेत...तर कैलास सोनवणेंविरुध्द खटला चालू शकतोविद्यमान नगरसेवक कैलास नारायण सोनवणे यांचे दोषारोपपत्रात नाव आहे, मात्र त्यात त्यांच्यावर कोणताही आरोप ठेवलेला नाही, परंतु फरार दाखविण्यात आले आहे. या मुद्यावर जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सोनवणे यांच्याविरुध्द कायदेशीररित्या खटला चालू शकतो असे मत व्यक्त केले. दरम्यान, या निकालाच्याविरुध्द अपील करु असेही अ‍ॅड.ढाके यांनी पत्रकारांना सांगितले.शिक्षा २४ महिन्याची; प्रत्यक्षात कारागृहात भोगले ४४ महिनेयाप्रकरणात उमेश धनराज कांडेलकर, रत्नाबाई सुरेश सोनवणे व वैशाली उमेश कांडेलकर यांना न्यायालयाने कलम ३२४ अन्वये दोन वर्ष म्हणजे २४ महिने कारावाची शिक्षा सुनावली. प्रत्यक्षात हे तीनही जण ४४ महिने कारागृहात होते. म्हणजे शिक्षेपेक्षा २० महिने ते जास्त कारागृहात होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव