धुळे : जिल्हयात विविध अपघातात एक ठार, तर ९ जण जखमी झाले. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवार हा अपघातवार ठरला आहे. धुळे तालुक्यातील मोघण गावाकडून धुळयाला येत असताना रविवारी दुपारी साडेबाराला मोटरसायकलला लळींग गावाजवळ चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात गजानन गवळी (वय ४०), शिलाबाई गजानन गवळी (वय ३५), राहुल गजानन गवळी (वय १३) हे जखमी झाले. त्यांना बापू गवळी यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. आज दुपारी कावठी- कुसुंबा- लामकानी रोडवर दोन मोटरसायकलची समोरा समोर धडक झाली. त्यात योगेश कैलास शिंदे (वय २५, रा. कावठी ता. धुळे), नाना मच्छिंद्र महाले (वय ३५), आबा प्रकाश बोरसे (वय ३०, रा. वडेल ता. धुळे) हे जखमी झाले. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. रविवारी दुपारी अडीच वाजता महामार्गावरील आर्वी गावाजवळ चारचाकी वाहनाने मोटरसायकलला धडक दिली. त्यात सचेंद्र बहादूरसिंग (वय ४०, रा. मध्यप्रदेश), दीपक बापू तोटे (वय २०), रामेश्वर बाळा आटोळे (वय ५५, रा. मोहाडी) हे जखमी झाले.
विविध अपघातात एक ठार, ९ जखमी
By admin | Updated: May 12, 2014 18:51 IST