आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.६ : मंगळवार हा आत्महत्याचा दिवस ठरला. जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे रामलाल पराग राठोड (वय ४८, मुळ रा.सुभाषवाडी, ता. जळगाव) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले तर दुसऱ्या घटनेत नांद्रा.बु. येथे भागाबाई माधव नन्नवरे (वय ६५) या वृध्देने आजारपणाला कंटाळून स्वत:च्याच घरात दोरीने गळफास घेतला. तिसºया घटनेत सर्जेराव भगवान धनगर (वय ३४, रा.वैजनाथ, ता.धरणगाव) या तरुणानेही गळफास घेऊन जीवन संपविले आहे.मोहाडी येथे शेतात घेतला गळफासमोहाडी येथे रामलाल राठोड या प्रौढाने शेतात निंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. राठोड हे मुळचे सुभाषवाडी, ता. जळगाव येथील रहिवाशी आहेत. ते मोहाडी येथे वास्तव्याला होते. छोटू कडू पाटील यांच्याकडे ते सालदार म्हणून कामाला होते. मंगळवारी पहाटे चार वाजताच उठून ते शेतात गेले. तेथे झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. इकडे जनावरांना चारा, पाणीसाठी राठोड न आल्याने मालक व कुटुंबाने त्याचा शोध घेतला असता शेतात त्यांनी गळफास घेतल्याचे सकाळी सात वाजता लक्षात आले. राठोड यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी कर्जबाजारीपणा हे कारण पुढे आले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व आई असा परिवार आहे. एका मुलाचे लग्न झालेले आहे.आजाराला कंटाळून वृध्देने संपविले जीवननांद्रा बु.,ता.जळगाव येथे भागाबाई माधव नन्नवरे (वय ६५) यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. भागाबाई यांनी सकाळी उठल्यानंतर दात घासले, त्यानंतर देवपूजा करण्यासाठी घरात गेल्या. त्यावेळी दरवाजा बंद करण्यात आला होता. आठ वाजले तरी दरवाजा उघडत नसल्याने शेजारील लोकांनी व गावातीलच नातेवाईकांनी दरवाजा ठोठावला असता आतून प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीच्या फटीतून बघितले असता त्यांनी खाटेवरुन गळफास घेतल्याचे दिसले. यावेळी तालुका पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी दरवाजा तोडून भागाबाई यांना खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात आणले.वैजनाथ,ता.धरणगाव येथील सर्जेराव भगवान धनगर (वय ३४) या तरुणानेही गळफास घेऊन जीवन संपविले. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.
एकाच दिवशी जळगाव तालुक्यात तिघांनी घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 14:46 IST
आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.६ : मंगळवार हा आत्महत्याचा दिवस ठरला. जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे रामलाल पराग राठोड (वय ४८, मुळ रा.सुभाषवाडी, ता. जळगाव) यांनी शेतात झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले तर दुसऱ्या घटनेत नांद्रा.बु. येथे भागाबाई माधव नन्नवरे (वय ६५) या वृध्देने आजारपणाला कंटाळून स्वत:च्याच घरात दोरीने गळफास घेतला. तिसºया घटनेत सर्जेराव ...
एकाच दिवशी जळगाव तालुक्यात तिघांनी घेतला गळफास
ठळक मुद्देधक्कादायक : मोहाडी, नांद्रा बु. व वैजनाथ येथील घटनाकर्जबाजारीपणा, आजारपणाने संपविले जीवनवैजनाथच्या तरुणानेही घेतला गळफास