शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ येथे एकावर तलवार हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:46 IST

भुसावळ येथील जळगाव रोडवरील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यातील विहिरीवर सहा जणांनी तलवारीने विकास देवीदास कोळी (वय ४०) या कामगारावर प्राणघातक हल्ला केला. यात विकास हा गंभीर जखमी झाला. ही घटना २५ मे रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देकाच बंगल्यातील घटनासहा आरोपी फरारभुसावळ शहरात खळबळ

भुसावळ, जि.जळगाव : येथील जळगाव रोडवरील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या काच बंगल्यातील विहिरीवर सहा जणांनी तलवारीने विकास देवीदास कोळी (वय ४०) या कामगारावर प्राणघातक हल्ला केला. यात विकास कोळी हा गंभीर जखमी झाला. ही घटना २५ मे रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या जळगावरोडवरील काच बंगल्यातील विहिरीवरुन सध्या शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याचे नियोजन येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश सपकाळे यांच्याकडे कामाला असलेले विकास देवीदास कोळी (वय ४०, रा.भुसावळ) यांच्याकडे आहे. २५ रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास कोळी व टँकरचालक काच बंगल्यात बसलेले होते. तेव्हा सहा जण दुचाकींवर काच बंगल्यात घुसले. त्यातील एकाने विकास कोळी यांना काच बंगल्यातून बाहेर बोलावले व विहिरीकडे घेऊन गेले. त्याठिकाणी आलेल्या अज्ञात सहा जणांनी त्यांच्यावर दोन तलवारींनी वार केले. यात त्यांच्या डोक्याला, दोन्ही पाय व उजव्या हातावर गंभीर जखमा झाल्या आहे.यावेळी परिसरात टँकर भरण्यासाठी आलेले टँकरचालकही उपस्थित होते. हल्ला सुरू होताच हल्लेखोरांनी टँकर चालकांना निघून जाण्याचा दम दिला. त्यानुसार त्यांनीही तेथून पळ काढला. हल्लेखोर कोळी यांना गंभीर जखमी करून दुचाकींवरुन पसार झाले. यानंतर टँकरचालकांनी कोळी यांना येथील पालिका रुग्णालायात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करण्यात आले. हाताला गंभीर दुखापत झाली असल्याने तत्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे जखमी कोळी यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.घटनेची माहिती समजताच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सरकार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनीही घटनास्थळी भेट देऊन जखमी कोळी यांची विचारपूस केली.याबाबत शहर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.दरम्यान, आठवडाभरात हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. २१ रोजी भर बाजारात तेली समाज मंगल कार्यालयाजवळ एका लग्नामध्ये प्रवीण चौधरी यांच्यासह त्यांच्या भावावर चॉपर, लोखंडी रॉडने वार करण्यात आला होता. यात ते दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शहरात तलवार चाकू चॉपर हल्ल्यामध्ये वाढ झाली झाली आहे. त्यामुळे शहरात नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBhusawalभुसावळ