शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

रिचार्जच्या नावाने १७ लाखात गंडा घालणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:14 IST

भोपाळमधून घेतले ताब्यात

जळगाव : मोबाईल रिचार्ज बॅलेन्स उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली अनेकांना १७ लाख ४५ हजार ३२४ रुपयात गंडा घालणाºया समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (रा.रामनगर) याला सायबर पोलिसांनी दहा महिन्यानंतर भोपाळ येथून अटक केली.समीर शेख याने गतवर्षी बीग किंग व्हॅलेट व अतीया पे वर्ल्ड हे दोन बेकायदेशीर अप्लीकेशन तयार केले. या वेबसाईटवर अनेक लोकांना लिंक केले. या माध्यमातून त्याने मोबाईल रिचार्ज बॅलेन्स देण्यासाठी जास्त कमिशन देण्याचे आमीष नागरीकांना दिले होते. त्यानुसार अमान इरफान अन्सारी (रा.फातीमानगर) याला १७ लाख ४५ हजार ३२४ रुपयांमध्ये गंडविले होते. भाविक रमेशचंद वेद, मोहम्मद नासिर अन्वर हुसेन, रिजवान अहमद शेख रमजानी, अशफाक खान अयुब खान, डॉ.शेख फिरोज, अहमद इबने मोहम्मद युसूफ, शेख जहीर अहमद कासम, अल्ताफ खान अयुब खान, अल्ताफ मुनाफ खाटीक या लोकांकडून त्याने लाखो रुपये घेऊन मोबदल्यात बॅलेन्स दिला नव्हता. पैशासाठी तगादा लागल्याने समीर हा जळगावातून पळून गेला होता.समीरला पकडण्यासाठी फिर्यादीने उडविली होती देशभरात खळबळपोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही महिने उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने फिर्यादी अमान इरफान पिंजारी याने २५ मे रोजी आरोपींचे फेसबुक अकॉऊंट हॅक करुन त्यावरुन आरोपी पती व पत्नीच्या नावे देशभरात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती.यावेळी सर्वत्र खळबळही उडाली होती. फेसबुक व मोबाईल कंपन्यांच्या माध्यमातून पोलिसांची छडा लावून अमान पिंजारीला अटक झाली होती. पोलीस मला अटक करु शकतात, मग समीर याला का अटक करीत नाहीत असा प्रश्न उपस्थित करुन सायबर पोलिसांवर आरोप केले होते.नाव बदलवून राहिला भोपाळमध्येसंशयित समीर हा नाव बदलवून भोपाळमध्ये राहत होता. याआधी तो इंदूर शहरात राहत होता, मात्र पोलीस तेथे पोहचल्याने त्याने हे ठिकाण बदलविले होते. आता जहीर खान असे नाव बदलून राहत असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, उपनिरीक्षक अंगत नेमाने, वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, दिलीप चिंचोले, अजय सपकाळे, आफ्रीन मन्सुरी यांच्या पथकाने त्याला भोपाळ शहरातून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला १४ आॅक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

टॅग्स :Jalgaonजळगाव