संशयित पटेल यास अटक करण्यात आली असून गॅस भरण्यासाठी आलेल्या तीन रिक्षा चालकांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. मोहसीन रहिम बागवान, रा. गौसियानगर, संजय तुकाराम खोडपे, रा. आनंदनगर, सूरज शंकर कदम रा. रूपवते सोसायटी अशी ताब्यात घेतलेल्या रिक्षा चालकांची नावे आहेत. सहा. पुरवठा अधिकारी विजय पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयित अब्दुल पटेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, भुसावळ बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ, हवालदार रवींद्र बिऱ्हाडे, नाईक विकास सातदिवे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, जीवन कापडे, प्रशांत सोनार, दिनेश कापडणे आदींच्या पथकाने केली.
घरगुती गॅस अवैधरित्या वाहनात भरताना एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:20 IST