उत्तम काळेभुसावळ : शहरातील समतानगरात भाजपचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात उर्फ हम्प्या यांच्यासह पाच जणांची हत्याकांडाला ६ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र वर्षभरानंतरही एका आरोपीचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळालेले नाही.६ आॅक्टोबर २०१९ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास भाजपाचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात उर्फ हम्प्या, त्यांचा भाऊ सुनील बाबूराव खरात, मुलगा सागर व रोहित रवींद्र खरात आणि सुमित गजरे या पाच लोकांचे हत्याकांड घडून आले होते.ही घटना जिल्ह्यात नव्हे तर राज्याला हादरवून सोडणारी होती. घटना घडल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री एकनाथराव खडसे, तत्कालीन पालक मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी भेट दिली होती तर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेसंदर्भात विश्वासू मंत्री व पोलिस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली होती. आठवले हे तर अंत्ययात्रेत ही सहभागी झाले होते.आठवले यांनी त्यावेळी हे हत्याकांड भयानक असून पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. या हत्याकांडाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.पाच आरोपींविरुद्ध झाला आहे पुन्हा दाखलया प्रकरणांमध्ये पोलिसांनी राज उर्फ मोहसीन अजगरखान, मयुरेश सुरवाडे, शेखर हिरालाल मोघे, आकाश सुखदेव सोनवणे या चार आरोपींना अटक केली होती, तर एक आरोपी गोलू उर्फ अरबाजखान हा अद्यापही फरार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.राजकीय नेत्यांच्या भेटी ठरल्या औपचारिकतादरम्यान, राजकीय नेत्यांनी घटनेनंतर भेटी दिल्या. मंत्री आठवले यांनी सीआयडी चौकशीची मागणी करण्याचे आश्वासन दिले. या खटल्याची चौकशी अखेरपर्यंत डीवाय. एस.पी.गजानन राठोड यांनी केली. सीआयडी चौकशीसंदर्भात कोणताही विषय नंतर पुढे आला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी या केवळ औपचारिकता ठरल्या.
भुसावळातील हम्प्या हत्याकांडातील एक आरोपी वर्षभरानंतरही फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:13 IST
भाजपचे तत्कालीन नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात उर्फ हम्प्या यांच्यासह पाच जणांची हत्याकांडाला ६ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मात्र वर्षभरानंतरही एका आरोपीचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळालेले नाही.
भुसावळातील हम्प्या हत्याकांडातील एक आरोपी वर्षभरानंतरही फरार
ठळक मुद्देसीआयडी चौकशीचे केद्रीय राज्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतराजकीय नेत्यांच्या भेटी ठरल्या औपचारिकता