टोकियो ऑलिम्पिक काही दिवसांवर आले आहे. त्यात राज्यातूनही काही खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा विचार राज्यकर्त्यांच्या मनात आला. त्यातून बॅनर प्रिंटिंग, सेल्फी पॉईंटच्या जुन्या कल्पनांना नव्याने उकळी फुटली. जिल्हाभरातही हाच कार्यक्रम राबवला गेला. क्रीडा कार्यालयाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते एका बॅनरचे उद्घाटन केले. तेथे आपले फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहन केले. त्यातील एक बॅनर क्रीडा संकुलाच्या गेटवर लावण्याचे ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयातच राहिला. हळूहळू येणाऱ्या-जाणाऱ्यांनी या बॅनरला कोपऱ्यात सरकवले. आणि आपली नियमित कामे सुरू ठेवली. दोन दिवस बॅनर कोपऱ्यात राहिले. या बॅनरसमोर जिल्हाधिकारी आणि क्रीडा अधिकारी यांच्याशिवाय किती जणांनी सेल्फी काढली. हे बॅनरच जाणो....
आकाश नेवे