शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृध्दांचेच प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:14 IST

दीड महिन्यात रुग्णालयात ३०पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू : १० महिन्याचे बाळ व ९८ वर्षीय महिलेचाही मृतांमध्ये समावेश

जळगाव : कोरोना बाधीत व कोरोना संशयित असलेल्या ३० च्यावर रुग्णांचा दीड महिन्यात मृत्यू झालेला असून सर्वसाधारण ५५ ते ८० या वयोगटातील वृध्दांचीच अधिक संख्या आहे. त्याशिवाय १० महिन्याच्या एका बाळाचा, ९८ वर्षीय महिला व ९० वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे. कोरोना बाधीत असले तरी दोन रुग्ण वगळता सर्वांना मधुमेह, हृदयविकार, कोणाला किडनी आजार, कर्करोग अशा विविध प्रकारच्या व्याधी होत्या, असेही आता स्पष्ट झालेले आहे.कोरोना बाधित मृतांची संख्या २५ असून यात केवळ एक ४० वर्षीय इसम आणि एक ४३ वर्षीय इसम आहे. उर्वरित सर्व ५५ वर्षे वयापेक्षा अधिक आहेत.पाचोरा आणि अमळनेर येथील दोघांना कोणत्याही व्याधी नव्हत्या. कोरोना बाधीत असलेल्या तिघांचा मृत्यू रुग्णालयात आणण्यापूर्वीच झाला आहे. तसेच सात संशयितांचाही मृत्यू रुग्णालयात आणण्याआधीच झाला होता. एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा हा ३० च्यावर व ३५ च्या आत आहे. कोरोना बाधित मृत्यूचा आकडा २५ इतका आहे. १० महिने, ४० व ४३ वर्षाचे तीन रुग्ण सोडले तर सर्वच मृत्यू झालेल्यांचे वय हे ५५ व त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूमध्ये वृध्दांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.रोगप्रतिकार शक्ती घटल्याने धोका५५ व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याचे हे एक प्रमुख कारण आहे. आजाराशी लढताना मानसिकदृष्ट्या न खचणारे वृध्दही आजारावर मात करीत आहेत. मेहरुणमधील ४८ वर्षीय प्रौढ व मुंगसे, ता.अमळनेर येथील ६० वर्षीय महिला वृध्दा हे त्याचे उदाहरण आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फळे, मोसंबी, संत्र्याचा ज्यूस, हिरव्या भाज्या, निंबू, कैरी आदींचा आहारात समावेश असावा, त्याशिवाय दर तासांनी थोडं कोमट पाणी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नोंदणीच नाहीमनपा जन्म-मृत्यू विभागाचे काम सध्या अतिशय संथगतीने सुरू आहे. या विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनासाठीच्या उपाययोजनांचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाउन झाल्यानंतर या विभागात शहरातील झालेल्या एकाही मृत्यूची नोंदणी झालेली नाही. ही नोंदणी केवळ स्मशानभूमीत होत आहे. लॉकडाउन काळात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात ३५९ मृत्यू झाले आहेत. तर मे महिन्यात २७ मृत्यू झाले आहेत. तर २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यान २१ जणांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव