आॅनलाईन लोकमतचाळीसगाव,दि.२१ : भरधाव चालणाऱ्या टँकरने २० रोजी रात्री १० वाजता धडक दिल्याने प्रभाकर उर्फ अण्णा उत्तम जाधव (वय-६५, रा.शिवाजी चौक, चाळीसगाव) हे गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मयत झाले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.चाळीसगावातील शिवाजी चौक भागातील प्रभाकर जाधव हे २० रोजी रात्री १० वाजता बसस्थानकाजवळून जात असताना भरधाव येणाºया टँकरने त्यांना जोरात धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हे.कॉ.भगवान उमाळे करीत आहेत.
चाळीसगावला टँकरच्या धडकेत वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 18:42 IST
भरधाव चालणाऱ्या टँकरने २० रोजी रात्री १० वाजता धडक दिल्याने प्रभाकर उर्फ अण्णा उत्तम जाधव (वय-६५, रा.शिवाजी चौक, चाळीसगाव) हे गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मयत झाले.
चाळीसगावला टँकरच्या धडकेत वृद्ध ठार
ठळक मुद्देचाळीसगावात टँकरच्या धडकेत वृद्ध ठारअपघातानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी केले दवाखान्यात दाखलउपचारा दरम्यान वृद्धाचा झाला मृत्यू