शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अगं अगं म्हशी, सांग कोठे जाशी, जामनेरात पुराण बोधकथेचा प्रत्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:09 IST

पोलिसांनी सोडविले कोढे

जामनेर : सव्वा वर्षापूर्वी हरविलेली म्हैस संबंधित मालकाला गावातच दिसल्याने ती आपली असल्याचे व सध्या ज्याच्याकडे ही म्हैस आहे, तोदेखील सदर म्हैस आपली असल्याचा दावा करू लागला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचते व ही म्हैस कोणाची? असा पेच पोलिसांपुढे पडतो. अशा कथानक वाटणाऱ्या या घटनेत जामनेर पोलिसांनी चातुर्य दाखवित आवाजावरून सदर म्हैस ज्याच्याकडे गेली, त्या मालकाकडे ती सोपविली.येथील कुंदन विलास सुरवाडे (रा. भिमनगर, जामनेर) यांच्या मालकिची मोहरा जातीची म्हैस १८ नोव्हेंबर २०१७ रोजी हरविली होती. याची तक्रार त्यांनी पोलिसांकडे दिली. मध्यंतरी त्यांना याच वर्णनाची म्हैस गोकूळ कडू पिसे (रा.दामले प्लॉट, जामनेर) यांच्याकडे आढळून आली. त्या वेळी त्यांनी आपली हरविलेली म्हैस दामले प्लॉट मध्ये असल्याचा दावा करीत परत मिळवून देण्याची मागणी केली.पोलिसांनी दामले प्लॉट मधून म्हैस पोलीस ठाण्यात आणली व सुरवाडे व पिसे दोघांना साक्षीदारांसह बोलाविले. दोघेही म्हैस आपलीच असल्याचे सांगत असल्याने पोलिसांसमोर पेच उभा राहीला. दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी एक अनोखी शक्कल लढविली. त्या म्हशीला एका कोºयात उभे केले व विरुध्द दिशेला पिसे व सुरवाडे यांना उभे केले आणि म्हशीला आवाज द्यायला सांगितले. आवाज दिल्यावर म्हैस ज्याच्याकडे जाईल तोच खरा मालक त्यानुसार दोघांनी दिलेल्या आवाजानंतर म्हैस पिसे यांच्यामागे येत त्यांच्याजवळ येऊन थांबली. अखेर पोलिसांनी ही म्हैस पिसे यांना सोपविली.पुराण कथेची आठवणजामनेरातील या घटनेने मात्र गावात असलेल्या एका गायीचे दोन मालक पुढे येतात आणि राजासमोर पेच पडल्याने ज्याचा आवाज ऐकून गाय ज्याच्याकडे जाईल, त्याच्याकडे ती गाय सोपविली जाईल, या पुराण काळातील शक्कलचा प्रत्यय रविवारी जामनेर येथे आला व पोलिसांच्या चातुर्याचेही दर्शन त्यातून घडले. येथे केवळ गायी ऐवजी म्हशीचे दोन मालक दावा करू लागल्याने आवाजावरून म्हैस ज्याच्याकडे गेली त्याला ती सोपविण्यात आली.आधीच कमी मनुष्यबळ असलेल्या जामनेर पोलिसांपुढे चोरी व दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींच्या शोधाचे आव्हाण असताना सव्वा वर्षापूर्वी हरविलेल्या म्हशीच्या मूळ मालकाला शोधण्याचे कसब पार पाडावे लागले.दरम्यान, यानंतरदेखील म्हशीच्या मालकी हक्काबाबत कुणाकडे काही पुरावे असतील तर ते दोन दिवसात सादर करण्याचे पोलिसांनी सांगितले. निरीक्षक प्रताप इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार किशोर पाटील तपास करीत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव