शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा...फवारणी करताच जळाली कपाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:58 IST

संकटाची मालिका संपेना : शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ

पिंपळगाव हरे, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या सावखेडा गावी कोमल अनिल पाटील (२३) व त्याची आई निर्मलाबाई अनिल पाटील यांनी आपल्या नफ्याने घेतलेल्या पाच ते साडेपाच एकर शेतात कपाशीची लागवड केली आहे. या कपाशीची चांगली वाढ व्हावी म्हणून त्यांनी कीटकनाशकांची फवाणी केली. मात्र त्याचा उलट परिणाम होऊन कपाशीची पाने जळून गेली. मोठे नुकसान झाल्याने हा तरुण शेतकरी हतबल झाल्याची स्थिती आहे.सावखेडा या लहानशा गावात राहणारा कोमल पाटील. वडील नसल्याने संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आईच्या मदतीने शेती करत असतो. गरिबी असली तरी त्याने एका शेतकºयाची जमीन कसण्यासाठी नफा तत्त्वावर घेतली होती. स्वत:जवळ जास्त पैसा नसल्याने इतरांजवळून पैशांची जमवाजमव करून मोठ्या हिमतीने शेतात कपाशीची लागवड केली. कपाशीचे उत्पादन चांगले येईल असे स्वप्न तो पहात असताना. कपाशीवर त्याने कीटकनाशकांची फवारणी केली. आणि झाले उलटेच. कपाशीची सर्व पाने जळून गेली आहे.ऐन फुलण्याच्या स्थितीत कपाशी असताना ती करपल्याने फार मोठे नुकसान झालेले आहे. सावखेडा गावातीलच एका कृषी केंद्रावरून कीटकनाशकांची खरेदी त्याने केली होती. कपाशीवरील रस शोषण करणारी कीड, अळी व अळींचे अंडे यांचा बंदोबस्त न होता कपाशीचे पाने जळाल्याने या शेताची अधिकाऱ्यांनी पहाणी करावी व या तरुण शेतकºयाला मदत करावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकºयांकडून होत आहे.या संदर्भात त्यांने कृषी अधिकारी पारोळा यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली असून शेतात अधिकाºयांनी यावे व पाहणी करून मदत करावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.