शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

निकषात बसत नसतानाही जळगाव जिल्ह्यात कजर्माफीसाठी भरले पदाधिका-यांनी अजर्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:28 IST

माहिती मागविली : निकषात न बसणा:यांची संख्या 1636

ठळक मुद्देजिल्ह्यातील तब्बल 1636 जण निकषात बसत नाहीशासनाच्या निकषानुसार कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16 - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कजर्माफी योजनेंसाठी विविध  संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी निकषात बसणार नसल्याचे राज्य शासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले असतानाही राज्यभरात ब:याच पदाधिका:यांनी यासाठी अर्ज भरले आहेत. त्यामुळे शासनाने जिल्हास्तरावरून अर्ज भरलेला असो वा नसो, निकषात न बसणा-या सर्व पदाधिका-यांची माहिती मागविली आहे. शासनाच्या पत्रानुसार जळगाव जिल्ह्यातील तब्बल 1636 जण या निकषात बसत नसल्याने याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने सहकार विभागाकडे पाठविण्यात आली आहे. कजर्माफीसाठी या पूर्वीच संपूर्ण माहिती अपलोड करण्यात आली. मात्र त्यात त्रुटी असल्याने त्यात दुरुस्ती करून राज्य शासनाच्या सहकार विभागाने 1 ते 66 कॉलममधील माहिती पुन्हा मागविली आहे. ही माहिती अपलोड केली तर जातच आहे. शासनाच्या पत्रानुसार जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहकारी पतसंस्था, नागरी सहकारी पतसंस्था, दूध संघ, सूत गिरणी, मजूर सोसायटी अशा संस्थांमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारिणी संचालक यांचीही माहिती पाठविण्यात आली आहे. शासनाने कजर्माफीसाठीचे निकष जाहीर करताना या संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी पात्र ठरणार नसल्याचे जाहीर केले होते. तरीदेखील यातील अनेक संस्थांच्या पदाधिका:यांनी अर्ज भरले आहे. शासनाच्या निकषानुसार या सर्वाना  कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही.हे बसत नाहीत निकषातअर्ज भरलेला असो वा नसो, कजर्माफीच्या निकषात न बसणा:यांमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, जिल्ह्यातील बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती 36 असून जिल्ह्यातील 3 सहकारी साखर कारखान्याचे 9, नागरी सहकारी बँकेचे अधिकारी व अध्यक्ष 39, पतसंस्थांचे चेअरमन, व्हॉईस चेअरमन 1294, जिल्ह्यात 3 सूत गिरण्या असून त्यांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व कार्यकारी संचालक, दूध संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष 247 असे एकूण 1636 जण कर्जमाफीच्या निकषात बसत नाहीत.