शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव तालुक्यातील १९७ बीएलओंवर आज दाखल होणार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 19:21 IST

दुपारपर्यंत काम सुरू करण्याची संधी: तहसीलदार निकम यांचा इशारा

ठळक मुद्दे छायाचित्रासह मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमशहरात ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागात ७८ बीएलओंची नियुक्तीशहरातील १५८ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ३९ बीएलओंकडून कामाला सुरूवातच नाही

जळगाव: मतदार याद्या पडताळणी व नोंदणीसाठी तालुक्यात नेमलेल्या ४६० बीएलओंपैकी शहरातील १५८ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ३९ अशा एकूण १९७ बीएलओंनी कारवाईचा इशारा देऊनही अद्याप कामच सुरू केलेले नाही. या बीएलओंना सोमवार दि.२७ रोजी दुपारपर्यंतची अंतीम संधी देण्यात आली असून दुपारपर्यंत कामाला सुरवात न केल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.छायाचित्रासह मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (बीएलओ) घरोघरी भेट देवून मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार शहरात ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागात ७८ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे.१५ तारखेला या मोहीमेला सुरूवात झाली असल्याने शहरातील ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ७८ बीएलओंनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार, २४ रोजी तालुक्यातील बीएलओंची बैठक तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार रूपाली काळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात बीएलओंनी अडचणींचा पाढा वाचला होता. ज्या कर्मचाºयांची बीएलओ म्हणून नियुक्ती होऊनही त्यांनी अद्यापही काम सुरू केलेले नसेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार निकम यांनी दिला होता. मात्र शनिवार, दि.२५ रोजीही या बीएलओंनी कामाला सुरूवात केलेली नव्हती. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाने या बीएलओंवर कारवाईची तयारी केली आहे. मात्र त्यांना सोमवार, दि.२७ रोजी दुपारपर्यंत अखेरची संधी दिली आहे. या कालावधीपर्यंत या बीएलओंनी कामास सुरूवात न केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.