शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडमध्ये ओडीएची पाईप लाईन पुन्हा फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:34 IST

संपूर्ण तालुकावासीयांसाठी संजीवनी ठरलेली ओडीए योजनेची जीर्ण पाईपलाईन ६ रोजी रात्री पुन्हा फुटली आहे. यामुळे बोदवड शहरासह तालुक्यातील २६ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

ठळक मुद्देहिंगणा व बोदवड शहराजवळ दोन ठिकाणी पाईपलाईन फुटली२००६ साली मुदत संपलेली पाईपलाईन फुटणे झाले नित्याचेबोदवड शहरासह तालुक्यातील २६ गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : संपूर्ण तालुकावासीयांसाठी संजीवनी ठरलेली ओडीए योजनेची जीर्ण पाईपलाईन ६ रोजी रात्री पुन्हा फुटली आहे. हिंगणा गावाजवळ आणि बोदवड शहराजवळ अशा दोन ठिकाणी ही पाईपलाईन फुटली आहे. यामुळे बोदवड शहरासह तालुक्यातील २६ गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.तालुक्याची तहान भागवणाऱ्या ओडीएच्या पाणीपुरवठा योजनेला घरघर लागली असून, या योजनेच्या पाईपलाइनला गत आठवड्यातच जोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. परंतु ६ रोजी रात्री पुन्हा आठ वाजेच्या सुमारास हिंगणा गावाजवळ ही पाईपलाइन फुटल्याने पाणीपुरवठा बंद पडला तर शेकडो लीटर पाणी वाहून गेले. तसेच बोदवड शहरातील जामठीकडे जाणारी साडेतीन इंचाची पाईपलाइनही फुटली आहे. पाईपलाइन जोडणीचे कार्य सुरू आहे. शनिवार, दि ८ जूनपर्यंत पाईपलाइन जोडून पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता ओडीएचे कर्मचारी मनोहर पाटील यांनी सांगितले.ओडीएच्या योजनेवरून पूर्वी ५१ गावांना पाणीपुरवठा होत असे. परंतु आता या योजनेत केवळ २६ गावे समाविष्ट आहेत. परिणामी या २६ गावांमधील पाणीपुरवठा शुक्रवारपासून पूर्णपणे ठप्प झाला आहे. आधीच पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांसमोर पाईपलाईन फुटण्याचे नवीन संकट निर्माण झाले आहे.यापूर्वी रस्त्याच्या कामामुळे वारंवार पाईपलाईन फुटत आलेली आहे. आज पाईनपाईन नेमकी कशामुळे फुटली याचे निश्चित असे कारण समजू शकले नाही.२००६ साली या पाईपलाईनची मुदत संपली. मुदतीपेक्षा अधिक कालावधी झालेला आहे आणि याच जीर्ण पाईपलाईनवर तालुकावासीयांची पाण्याची भूक भागविली आहे. या जीर्ण पाईपलाईनला पर्याय म्हणून दुसरी पाईनपाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र त्याला वेळ लागणार आहे. अशा परिस्थितीत नवीन पाईपलाईनच्या कामाला गती देण्याची तालुकावासीयांची मागणी आहे.पाईपलाईनला वारंवारच्या गळतीने तालुकावासीय त्रस्त झाले आहेत. तसेच ओडीएच्या पूर्णा नदी पात्रातही पाण्याची पातळी खालावल्याने गढूळ पाणी नळाला येत आहे. अजून किमान महिनाभर पाणीटंचाईचा सामना शहरवासीयांना करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBodwadबोदवड